बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याचा चित्रपट ‘भूल भुलैय्या २’मुळे चर्चेत आहे. प्रदर्शनाच्या २ आठवड्यांनंतरही कार्तिकचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकून आहे. आतापर्यंत या चित्रपटानं १३३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी कार्तिकची तुलना अक्षय कुमारसोबत केली जात होती. कारण या चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होता. ‘भूल भुलैय्या २’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरल्यानंतर आता कार्तिक आर्यन लवकरच अक्षय कुमारला ‘हाऊसफुल’ फ्रँचाइजीमध्ये रिप्लेस करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. यावर कार्तिक आर्यननं प्रतिक्रिया दिली आहे.

कार्तिक आर्यननं सोशल मीडियावरील चर्चांवर मौन सोडताना एक ट्वीट केलं आहे. आपल्या ट्वीटवरमध्ये एक आर्टीकल शेअर करताना कार्तिक आर्यननं अक्षयला रिप्लेस करण्याचं वृत्त निराधार असल्याचं म्हटलं आहे. त्याने लिहिलं, “कोणी मला सुद्धा विचारेल का की माझा आगामी चित्रपट कोणता आहे? निराधार.” कार्तिकच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या पाहायला मिळत आहेत.

आणखी वाचा- “मला ब्रेस्ट सर्जरी करण्यास सांगितलं होतं” प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

कार्तिकच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना एका युजरनं लिहिलं, ‘कार्तिक आर्यन प्रत्येक दृष्टीकोनातून आगामी अक्षय कुमार आहे कारण, कॉमेडी चांगली करतो, चित्रपट हिट देतो. हे ट्वीट बुकमार्क करून ठेवा.’ दुसऱ्या एका युजरनं यावर प्रतिक्रिया देताना लिहिलं, ‘आता तूच सांग तुला आगामी चित्रपट कोणता आहे.’

आणखी वाचा- Jiggle Jiggle ट्रेंडवर मलायका अरोराचा धम्माल डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कार्तिक आर्यनचा ‘भूल भुलैय्या २’ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या चित्रपटापेक्षा फारच वेगळा आहे. अक्षय कुमार त्यावेळी मनोचिकित्सकाच्या भूमिकेत दिसला होता. तर कार्तिकची ‘भूल भुलैय्या २’मध्ये खूपच वेगळी भूमिका आहे. अर्थात या दोन्ही चित्रपटात बरंच साम्य देखील आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच एका मुलाखतीत अक्षय कुमारशी तुलना होण्यावर कार्तिक आर्यननं मोठं वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला होता, “भूल भुलैय्या मध्ये मला अक्षय कुमारची भूमिका खूप आवडली होती. मी त्याला पाहत मोठा झालोय. आपल्यापैकी बरेचजण त्याला पाहत पाहत लहानाचे मोठे झालेत. त्यामुळे त्यांच्याशी तुलना केली गेली नाही तरच चांगलं.”