कतरिनाच्या हातावर लागणाऱ्या मेहंदीची किंमत ऐकूण व्हाल थक्क

कतरिना आणि विकी राजस्थानमध्ये लग्न करणार असल्याचे म्हटले होते.

katrina kaif, katrina kaif mehendi,
कतरिना आणि विकी राजस्थानमध्ये लग्न करणार असल्याचे म्हटले होते.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनांत अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा साखरपुडा झाल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर येत्या डिसेंबरमध्ये ते दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्या लग्नाची तयार सुरु असल्याचे सांगण्यात येत होते. कतरिनासाठी सोजत मेहंदी जोधपूरच्या पाली भागातून पाठवली जाईल. जगभरात सोजत हे मेहंदीसाठीचं खास स्थान आहे. ही मेहंदी कतरिनाला भेट म्हणून दिली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विकी आणि कतरिनाच्या लग्नासाठी मेहंदीचा नमुना आधी तपासण्यात आला होता. आता मेहंदीचा नमुना पास झाल्याचे सांगण्यात येत आहे. कतरीनासाठी नैसर्गिकरित्या मेहंदी तयार करत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचे रसायन वापरले जाणार नाही. सोजत मेहंदी हाताने तयार करून कतरिनाला पाठवली जाईल. सोजतच्या मेहंदी विक्रेत्याच्या म्हणण्यानुसार, कतरिनाची मेहंदी ही जवळपास ५०हजारांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत असेल, परंतु व्यापारी तिच्याकडून एकही रुपया घेणार नाही, असे वृत्त रिपोर्ट्सने दिल्याचे सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा : शत्रुघ्न सिन्हांची मुलगी होणार सलीम खान यांची सून? सोनाक्षीने केला तिच्या पहिल्या प्रेमाचा खुलासा

या दोघांच्या लग्नाच्या वेळी फक्त कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित असणार आहेत. सर्व प्रथा परंपरेने लग्न करण्यापूर्वी कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही शाही लग्नासाठी राजस्थानला रवाना होण्यापूर्वी पुढील आठवड्यात मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. लग्नाच्या सर्व तयारीसाठी त्यांची टीम याची चाचपणी सध्या करत आहे, असे म्हटले जात आहे.

आणखी वाचा : निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी; जाणून घ्या कारण

रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ राजस्थानमध्ये शाही लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाचे सगळे कार्यक्रम हे ७ ते १२ डिसेंबर दरम्यान होणार आहेत. दरम्यान, नुकताच कतरिनाचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कतरिना अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. तर दुसरीकडे विकीचा ‘उधम सिं’ग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Katrina kaif mehendi cost is in lakhs know he price dcp

ताज्या बातम्या