गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या काही दिवसात ते दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. त्यांच्या लग्नासाठी दोघांचेही चाहते फार उत्सुक असल्याचे दिसत आहे. कतरिना आणि विकी यांच्या लग्नाची सर्व तयारी गुपचूप करत असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे या दोघांचा लग्नसोहळा रितीरिवाजाप्रमाणे थाटामाटात पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे.

कतरिना आणि विकी कौशल यांचा विवाह ९ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. हे दोघेही कोणत्या विधीला काय परिधान करतील, याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. कतरिना ही मेहंदीच्यावेळी अबू जानीने डिझाईन केलेला ड्रेस परिधान करणार आहे, तर संगीत सोहळ्यासाठी कतरिनाही मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला ड्रेस परिधान करणार असल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या दिवशी ती गुच्ची या ब्रँडने डिझाईन केलेला पोशाख परिधान करणार आहे.

या दोघांचे लग्न राजस्थानमधील सवाई माधोपूर या ठिकाणच्या सिक्स सेन्सेस राजमहालात आयोजित करण्यात आला आहे. त्या दोघांचा विवाह अलिशान आणि भव्यदिव्य पद्धतीने होणार असल्याचेही बोललं जात आहे. यात एका रात्रीच्या मुक्कामासाठी राहण्याचा खर्च हा जवळपास ७ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा : सौंदर्यासाठी नाही तर ‘या’ कारणामुळे अभिषेकने केले ऐश्वर्याशी लग्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे विकी आणि कतरिनाच्या लग्न हे सर्व प्रथा परंपरेनुसार होणार आहे. यासाठी खास महाराष्ट्रातील प्रतिष्ठित पंडित येणार आहेत. हा संपूर्ण विवाह व्यवस्थित प्रथा परंपरेनुसार पार पाडण्यासाठी तीन खास पंडितांना आमंत्रण देण्यात आले आहे. या पंडितांकडून कतरिना आणि विकी कौशलच्या लग्नाच्या संपूर्ण विधी महाराष्ट्रीयन पंडित पूर्ण करणार आहेत. या दोघांचा विवाह हिंदू प्रथा परंपरेनुसार होणार असल्याचे बोललं जात आहे.