अभिनेत्री कीर्ती कुल्हारीने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमुळे कीर्तीला नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय. या व्हिडीओत कीर्ती एका व्यक्तीला करोनाची लस देताना दिसून येतेय. मात्र ही लस दंडावर देण्याएवजी कीर्ती ही लस त्या व्यक्तीच्या नस असलेल्या ठिकाणी देताना दिसून येतेय. यावरूनच नेटकऱ्यांनी कीर्तीला ट्रोल केलंय. अशी लस नव्हे तर ड्रग्स घेतले जातात असं म्हणत नेकऱ्यांनी कीर्तीवर निशाणा साधला. मात्र ट्रोल करणाऱ्या या नेटकऱ्यांना देखील आता कीर्तीने चांगलच सुनावलं आहे.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये कीर्ती म्हणालीय, “अजुनपर्यंत तुम्हाला लस नाही मिळाली? चिंता कशाला डॉक्टर सायरा सभरवाल आहे ना…” यासोबतच तिने एक खास टीप लिहिली आहे. “प्लीज रिलॅक्स हे खोटं इंजेक्शन आहे. शूटिंगासाठी हे वापरण्यात आलंय. मजा म्हणून हा व्हिडीओ शूट करण्यात आलाय. या शिवाय कोव्हिड लस घेण्याचा मेसजही द्यायचा होता. ”
View this post on Instagram
हे देखील वाचा: काम नसेल तर…”, सुनील पालच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनोज वाजपेयीचं उत्तर
मात्र अनेक नेटकऱ्यांनी कीर्तीने लिहिलेलं कॅप्शन न वाचताच केवळ व्हिडीओ पाहून कीर्तीला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अनेक नेटकऱ्यांनी “करोना लस ही इंट्रामस्क्युलरवर किंवा दंडावर घेतली जाते शिरेच्या आत नाही.” असं म्हणत कीर्तीला ट्रोल केलंय. तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “ड्रग्स देतेयस का त्याला.” तर काही चाहत्यांनी मात्र कीर्तीची बाजू सावरत कीर्तीने कॅप्शनमध्ये सर्व स्पष्ट केलंय असं म्हणत ट्रोल करणाऱयांनाच सुनवलं आहे. ट्रोलर्सच्या या कमेंटवर कीर्तीने देखील उत्तर दिलंय. कमेंट करत कीर्ती म्हणाली, ” बोलू द्या यार बाहेर पडणं पण गरजेचं आहे नाहीतर पोट खराब होईल.”

‘ह्यूमन’ या वेब सीरिजमध्ये कीर्ती कुल्हारी डॉक्टरच्या भूमिकेत झळकणार आहे. या वेब सीरिजच्या प्रोमोशनसाठीच कीर्तीने हा व्हीडीओ शेअर केलाय. या वेब शोमध्ये कीर्तीसह शेफाली शाह, सीमा बिस्वास आणि राम कपूर हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.