scorecardresearch

समीर वानखेडेंचा चैत्यभूमीवरील अभिवादनाचा फोटो शेअर करत क्रांती रेडकर म्हणाली…

Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din : या दिवशी त्यांचे अनुयायी अभिवादन करण्यासाठी दादर येते येतात

समीर वानखेडेंचा चैत्यभूमीवरील अभिवादनाचा फोटो शेअर करत क्रांती रेडकर म्हणाली…
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

Mahaparinirvan Diwas: अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तर ती विविध व्हिडीओ शेअर करत असते. मेकअपबद्दल टिप्स, एखादा दिवसभरात घडणारा प्रसंग. घरगुती गप्पा-गोष्टी असे अनेक क्रांतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. क्रांतीचे पती समीर वानखेडे नेहमीच चर्चेत असतात. महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने समीर वानखेडे यांनी दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले.

६ डिसेंबर हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभरातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. समीर वानखेडे यांनीदेखील अभिवादन केले असून क्रांती रेडकरने याचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. या फोटोला तिने ‘जय भीम’ असा कॅप्शन दिला आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्ग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर करण्यात आलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात अडकले. मात्र प्रत्येक प्रसंगांना ते हिंमतीने सामोरे गेले. क्रांती देखील आपल्या पतीच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. आता तर सोशल मीडियावर समीर यांच्या फॅन फॉलोईंगमध्येही वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 12:22 IST

संबंधित बातम्या