बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. लारा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. गेल्या काही दिवसांपासून लारा तिच्या ‘Hickups & Hookups’ या सीरिजमुळे चर्चेत आहे. तर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला ऑनस्क्रिन किंसींग सीन द्यायला काही हरकत नसल्याचं लारा म्हणाली होती.
लाराने नुकतीच फिल्म कंपॅनियनला मुलाखत दिली. यावेळी लारा ऑनस्क्रिन किसींग सीन देण्याबद्दल बोलली आहे. “एक कलाकार म्हणून मला सर्व पैलूंचा शोध घ्यायचा आहे. पण भारतात मी पण कोणाची तरी पत्नी आहे. मी एक आई, मुलगी आणि सूनही आहे. सुदैवाने किंवा दुर्दैवाने, काही विशिष्ट कंडिशनिंग असतात ज्या आपल्याला दिल्या जातात, त्या कुठेतरी आपल्या लक्षात असतात. त्यामुळे अर्थातच, जर मी असा शो करणार आहे, ज्यात असे काही सीन आहेत, तर त्यासाठी थोडा विचार करावा लागतो”, असे लारा म्हणाली.
आधी पती महेश भुपतीशी यावर चर्चा केल्याचं सांगत लारा म्हणाली, “या गोष्टीवर महेशशी चर्चा करणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाच होतं. कारण यावरून कळणार होतं की मला यात अनकम्फर्टेबल वाटत नाही आहे आणि मी काय काय करु शकते. एवढचं काय तर त्यावर लोकांची प्रतिक्रिया काय असू शकते अशा सगळ्या गोष्टी. माझ्या मर्यादा काय आहेत हे मला माहित आहे. लारा म्हणून मी याबद्दल अगदी स्पष्ट आहे.”
आणखी वाचा : निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी; जाणून घ्या कारण
त्यानंतर लाराने चित्रपटांमध्ये इंटिमेट सीनवर करण्यावर तिचा कसा दृष्टिकोन आहे याबद्दल सांगितले. “मी यापूर्वीही हे केले आहे आणि मला माहीत आहे की मला ऑनस्क्रीन किस करण्यात कोणतीही अडचण नाही. फक्त एक कलाकार म्हणून मला माहीत आहे की, ही दृश्ये शूट करणे किती तांत्रिक आहे. जेव्हा तुम्ही सेटवर जाता तेव्हा असं काही होत नाही किंवा दोन कलाकारांना एकत्र पाठवून असं बोललं जात नाही की तुम्ही इंटिमेट सीन करा आणि आम्ही पाहतो तुमच्यात ती केमिस्ट्री आहे की नाही. हे सगळं जेव्हा स्क्रिप्टमध्ये लिहिलेलं असतं तेव्हाच घडतं.”
आणखी वाचा : प्रियांका होणार आई? निकसोबत चाहत्यांनाही बसला धक्का
लवकरच लाराची ‘Hickups & Hookups’ ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये लारासोबत प्रतीक बब्बर, शिनोवा, दिव्या सेठ, नस्सर अब्दुल्ला, खालिद सिद्दीकी दिसणार आहेत. तर मीयांग चांग मुख्य भूमिकेत आहेत. भावंडांन मध्ये असलेले त्यांचे नाते यात दाखवण्यात येणार आहे. ही सीरिज २६ नोव्हेंबर रोजी लायन्सगेट प्ले या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.