रंग, रुप किंवा देहरचनेवर तुमचं सौंदर्य किती चांगलं आहे हे ठरत नाही हे वाक्य अभिनेत्री वनिता खरातला अगदी शोभून दिसतं. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे वनिता घरघरांत पोहोचली. पण या कार्यक्रमाशिवाय तिने मराठीसह हिंदी चित्रपटामध्येही भूमिका साकारल्या. शाहीद कपूरच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटामध्ये तिने साकारलेली भूमिका तर क्या बात… अभिनेत्री म्हटलं की सडपातळ बांधा डोळ्यासमोर उभा राहतो. पण अभिनेत्रीच्या लूकबाबतची व्याख्या वनिताच्या मते काही वेगळीच आहे.

आणखी वाचा – “शाळेत असताना क्रशला काय गिफ्ट दिलं?” वनिता खरात म्हणते, “बॉयफ्रेंड आता…”, जुना व्हिडीओ व्हायरल

सोनी मराठीच्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये वनिताने चाहत्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या. यावेळी ती आपल्या करिअरबाबत तसेच खासगी आयुष्याबाबतही बोलत होती. आपलं वजन अधिक असल्याचं वनिताला अजिबात दुःख नाही. इतकंच नव्हे तर तिला मेकअप करणंही आवडत नाही.

इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये नवरात्रीच्या उपवासाबाबत वनिता खरातला एका चाहत्याने विचारलं. तेव्हा ती म्हणाली, “नवरात्रीचे उपवास मी कधीच करत नाही. कारण मी बारीक झाले तर…” वनिताने अगदी गंमतीने या प्रश्नावर उत्तर दिलं. शिवाय अभिनेत्री असूनही वनिताला मेकअप करणं फारसं आवडत नसल्याचंही ती यावेळी म्हणाली.

आणखी वाचा – Video : आधी भावाला गमावलं आता आईचं निधन, इंदिरा देवी यांना अखेरचा निरोप देताना महेश बाबूला अश्रू अनावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला मेकअप करायला अजिबात आवडत नाही. मला अगदी साधेपणा आवडतो. बघा आताही मी लाइव्हसाठी अगदी मेकअप न करता बसली आहे.” असं वनिताने यावेळी सांगितलं. सध्या इतर विनोदवीरांबरोबर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये ती करत असलेलं काम तर कौतुकास्पद आहे.