झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेची लोकप्रियता दिवसागणिक वाढतच चालली आहे. या मालिकेचे कथानक आणि त्यातील व्यक्तिरेखा अनेकांच्या आवडीच्या बनल्या आहेत. या मालिकेतील इंद्रा आणि दिपूची जोडी सुद्धा प्रेक्षकांना भावते आहे. या मालिकेत इंद्राचे पात्र साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊतचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे. त्यामुळे पुढील काही दिवस तो इन्स्टाग्रामवर दिसणार नाही.

अभिनेता अजिंक्य राऊत हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो इन्स्टाग्रामवर कायमच विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. मात्र नुकतंच अजिंक्यचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाले आहे. काही हॅकर्सने त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक केल्याची माहिती समोर आली आहे. अजिंक्यला ही माहिती मिळताच त्याने त्याचे हे पेज डिअॅक्टिव्हेट केले आहे. नुकतंच ई-टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ई टाईम्सने दिलेल्या वृत्ताला दुजोरा देत अजिंक्य राऊतने त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केल्याचे सांगितले आहे. यामुळे पुढील काही दिवस त्याला चाहत्यांच्या संपर्कात राहता येणार नाही. तसेच पुढील काही दिवस तो इन्स्टाग्रामवर फोटो किंवा व्हिडीओ शेअर करताना दिसणार नाही. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

‘मन उडू उडू झालं’ मालिकेत हृतासोबत झळकणाऱ्या अभिनेत्याबद्दल ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजिंक्य राऊत हा मन उडू उडू झालं या मालिकेतील इंद्रजित साळगावकर या भूमिकेमुळे घराघरात पोहोचला आहे. या मालिकेत तो हृता दुर्गुळेसोबत झळकताना दिसत आहे. ‘मन उडू उडू झालं’या मालिकेमुळे तो घराघरात प्रसिद्ध झाला आहे. मॉडलिंग करत असताना अजिंक्यला विठू माऊली या मालिकेत झळकण्याची संधी मिळाली होती. अजिंक्य हा लवकरच चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. टकाटक २ या मराठी चित्रपटातून तो सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. याचे चित्रपटाचे चित्रीकरण गोव्यात झाले आहे.