गेल्या एक दशकापासून अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेत्री सोनाली खरे या दोघीही मराठी सिनेरसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत आहे. तेजस्विनी आणि सोनाली यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांत दमदार काम केलं आहे. त्या दोघीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच या दोघींनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आहे.

तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे या दोघींनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्या दोघींनीही मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही, असे म्हणत भर व्हिडीओत स्वत:च्या ओठावरील लिपस्टिक पुसली. या व्हिडीओला कॅप्शन देताना माझा लिपस्टिकला विरोध आहे. बॅन लिपस्टिक! असे म्हटले आहे. त्यानंतर त्या दोघींनीही Ban lipstick असा हॅशटॅगही वापरला आहे.

या दोघींनीही हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. “आता हे काय नवीन, असं ही, मास्क लावल्यावर कुठे दिसते लिपस्टिक?” असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने “मग लावलीच कशाला??? आणि लावायची होती तर पुसलीच कशाला??? काहीही करतात लोकं,” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा : “बाबा जाऊ नको दूर…”, वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्री सायली संजीवची भावनिक पोस्ट

तेजस्विनी आणि सोनाली यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमागे त्यांचा नेमका काय हेतू आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. एखाद्या आगामी चित्रपट आणि नाटकाच्या प्रमोशनसाठी त्या दोघीही लक्ष वेधून घेत असल्याचे बोललं जात आहे. सध्या त्या दोघींच्या व्हिडीओची प्रचंड चर्चा पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र त्यांचा हा व्हिडीओ नेमका कशासाठी आहे याचा उलगडा अजून झालेला नाही. त्यांचा हा व्हिडीओ प्रमोशनचाच एक भाग असल्याचे म्हटले जात असले तरी त्या दोघी कोणत्या चित्रपटात किंवा नाटकात झळकणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सध्या प्रेक्षक औत्सुक्याने यामागे नेमके काय कारण आहे हे शोधताना दिसत आहेत.