‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून सायली संजीवला ओळखले जाते. ती सध्या वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. सायलीने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलं आहे. नुकतंच सायलीने तिचा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो तिने शेअर केले आहेत. यावेळी ती वडिलांच्या आठवणीत काहीशी भावूक झाल्याचे पाहायला मिळाली.

सायली संजीवचा ३१ जानेवारीला वाढदिवस असतो. दरवर्षी मोठ्या थाटामाटात ती वाढदिवस साजरा करते. मात्र गेल्या ३० नोव्हेंबर २०२१ ला सायलीच्या वडिलांचे निधन झाले. यामुळे यंदा तिने तिचा वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा केला. याचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

सायलीने पोस्ट केलेल्या फोटोत तिच्यासमोर तीन केक दिसत आहेत. त्यासोबत तिच्या आजूबाजूला फुलांचा गुच्छही दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने तिच्या वडिलांचा फोटो हातात धरला आहे. यात ती तिच्या वडिलांकडे बघताना भावूक झाल्याचे दिसत आहे. हा फोटो पोस्ट करताना ती म्हणाली, “माझ्या वाढदिवसाला खूप खास बनवल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.”

त्यासोबत तिने तिच्या वडिलांसोबतचा आणखी एक फोटो शेअर केला आहे. “मला अतिशय सुंदर आयुष्य दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद…तुम्हीच माझं सर्वस्व आहात”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. दरम्यान हे दोन्हीही फोटो पोस्ट करतेवेळी ती फार भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आई कधी होणार?; ४८ वर्षीय उर्मिला मातोंडकरने दिलेल्या उत्तराची होतेय चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सायली संजीवने झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ही तिची पहिली मालिका होती. या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली. यानंतर तिने शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत काम केले. या मालिकेतील तिच्या शर्वरी या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. काही दिवसांपूर्वी ती झिम्मा या चित्रपटातही झळकली होती.