अभिनेत्री पूजा सावंत ही मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आतापर्यंत तिने विविध चित्रपटांमधून उत्तमोत्तम भूमिका साकारलेल्या. तिच्या कामाबरोबरच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत करते. आता तिने तिच्या साखरपुड्याच्या चर्चांवर भाष्य केलं आहे.

पूजाच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. गेले अनेक दिवस तिच्या डेटिंगच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. तिचा साखरपुडा झाला असल्याचंही बोललं जात होतं. मध्यंतरी पूजाने तिचा एक फोटो पोस्ट केला होता, ज्या फोटोमध्ये तिच्या रिंग फिंगरमध्ये अंगठी दिसली होती. तो फोटो पाहून तिने गुपचूप साखरपुडा उरकल्याचं बोललं जाऊ लागलं. आता त्या सर्व चर्चांवर मौन सोडत पूजाने प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : डायमंडचं नाजुक डिझाईन अन्…; अमृता देशमुख-प्रसाद जवादे यांच्या अंगठ्या पाहिल्यात का? फोटो व्हायरल

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “नाही. मी अंगठी उजव्या हातात घातली आहे. माझा साखरपुडा झालेला नाही. ही बातमी मलाही खूप उशिरा कळली.” याचबरोबर “साखरपुडा करण्यासाठी आयुष्यात कोणीतरी हवं”, असंही ती म्हणाली. त्यामुळे आता पूजा सावंतने साखरपुडा केलेला नाही हे आता स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा : ‘बाईपण भारी देवा’ पाठोपाठ ‘अफलातून’ही सुपरहिट, सिद्धार्थ जाधव-जॉनी लिवर यांच्या चित्रपटाने दोन दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पूजा सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. लवकरच ती मुसाफिरा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं तिने सांगितलं आहे. त्यामुळे आता तिचे चाहते तिच्या या चित्रपटासाठी उत्सुकता व्यक्त करत आहेत.