उमेश कामत हा मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या कामाचं नेहमीच कौतुक होत असतं. त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. त्याच्या कामाबरोबरच त्याच्या लूक्समुळे तो लक्ष वेधून घेत असतो. जर एखाद्या मुलीने उमेशशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर प्रियाची काय प्रतिक्रिया असते हे आता तिने सांगितलं आहे.

उमेश आणि प्रिया नेहमीच एकमेकांबद्दल भरभरून बोलत असतात. त्यांच्याकडे त्यांचे चाहते आदर्श जोडपं म्हणून बघतात. त्या दोघांना एकमेकांबद्दल कधीही असुरक्षितता वाटत नाही. याबद्दल प्रिया ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मोकळेपणाने बोलली. जर एखाद्या मुलीने उमेशशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला तर तिची कशी प्रतिक्रिया असते हेही तिने सांगितलं.

आणखी वाचा : उमेश कामत-प्रिया बापटने ‘या’ नावांनी सेव्ह केले आहेत एकमेकांचे नंबर, जाणून घ्या मजेशीर कारण

प्रिया म्हणाली, “गेली १७ वर्षे आम्ही एकमेकांना ओळखतो. आमच्यातलं नातं खूप घट्ट आहे. आम्हाला एकमेकांबाबत अजिबात असुरक्षितता वाटत नाही. जर एखादी मुलगी कधी उमेशशी फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला ते कळतही नाही. मीच त्याला सांगते की अरे ती तुझ्याशी फ्लर्ट करत आहे. पण त्यावेळी त्याला ते पटत नाही. काही दिवसांनी त्याला मेसेज येतात की उमेश, आपण कॉफी प्यायला भेटूया का? मग त्याला मी आधी सांगत होते ते पटतं.”

हेही वाचा : “मी मालिकांपासून लांब राहिले कारण…”, प्रिया बापटचा खुलासा, म्हणाली, “या माध्यमात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियाचं हे बोलणं आता चांगलंच चर्चेत आलं आहे. अरे आज बरोबर यांच्यातील या बॉण्डिंगचं त्यांचे चाहते कौतुक करत आहेत. ‘…आणि काय हवं’ या सिरीजनंतर उमेश-प्रिया एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसले नाहीत. त्यामुळे ते दोघं आता कधी एकत्र काम करणार आकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.