Tejaswini Pandit Shares Birthday Post For Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. राज ठाकरे त्यांचा ५७ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी कुटुंबासह मुंबईबाहेर गेले आहेत. त्यामुळे वाढदिवशी कोणीही शिवतीर्थावर येऊ नका, आपण लवकरच भेटू असं आवाहन त्यांनी मनसैनिकांना पत्र लिहून केलं होतं. यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.

राज ठाकरेंना आज सर्व स्तरांतून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत. मराठी कलाकार मंडळींनी देखील राज ठाकरेंना खास पोस्ट लिहित शुभेच्छा दिल्या आहेत. लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

तेजस्विनी राज ठाकरेंबरोबर फोटो शेअर करत लिहिते, “मराठी अस्मितेच्या पाठीराख्याला, मराठी भाषेच्या पोशिंद्याला, महाराष्ट्राच्या भूमीपुत्राला आणि या सगळ्या पलीकडे एका मनस्वी, सच्च्या, अनोख्या व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा! राजसाहेब… खरंच, तुमच्यासारखा साचा देवाने बनवणं केव्हाच सोडून दिलं! देव तुम्हाला दीर्घायू देवो आणि तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो! हसत राहा…”

तेजस्विनी पंडितच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत राज ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. “मराठी माणसाच्या पाठीराख्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”, “पूर्ण भारतात एकमेव प्रॅक्टिकल राजकारणी…. प्रामाणिकपणे वागणाऱ्या माणसांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व. फक्त आदरणीय राजसाहेब.”, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राज साहेबांना”, “मराठी माणसाचा पाठीराखा….! साहेब वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”, “आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्र आशेने पाहतोय…एक सामान्य मराठी माणूस म्हणून आपल्यावर असलेली विश्वासाची भावना शब्दांत मांडणं कठीण आहे…पण एवढं नक्की – आपण आहात म्हणून अजूनही अनेकांची स्वप्नं जिवंत आहेत.” अशा असंख्य प्रतिक्रिया या पोस्टवर आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तेजस्विनी पंडितच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘येक नंबर’ सिनेमाची निर्मिती तेजस्विनीने केली होती. हा सिनेमा राज ठाकरेंवर आधारित होता. या सिनेमाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला.