महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसेच्या नवीन पक्षगीताचे लोकार्पण करण्यात आले. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तने हे गाणं गायलं आहे. नुकतंच त्याचा संपूर्ण व्हिडीओ समोर आला आहे. सध्या हे गाणं ट्रेडींगला असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच मनसेच्या या नव्या गाण्यावर प्रसिद्ध अभिनेता आकाश ठोसरने प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा (बुधवार) २२ मार्च गुढीपाडवा मेळावा पार पडला. काल अवधूत गुप्तेने त्याच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर मनसेच्या नवीन पक्षगीताचा व्हिडीओ शेअर केला आहे. मनसेचे नवीन पक्षगीत हे ५ मिनिटांचे आहे. “प्रश्न जिथे मनसेचा, मार्ग तिथे मनसेचा, नवनिर्माण घडवूया, मनसे…” असे या गाण्याचे बोल आहे. या गाण्याची सुरुवात राज ठाकरेंच्या आवाजाने होते.
आणखी वाचा : Video : “धाडसी करारी राजसाहेब आपले, पाठीशी असताना डरायचं नाय…” पाहा मनसेच्या नव्या गाण्याचा Uncut व्हिडीओ

यात राजमुद्रा, छत्रपती शिवाजी महाराज, तुळजाभवानी देवी यांसह अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख आहे. त्याबरोबर या गाण्यात राज ठाकरेंचेही वर्णनही करण्यात आले आहे.

आणखी वाचा : “मी तयार, फक्त तिला…” आकाश ठोसरने सांगितली लग्नासाठीची एकमेव अट

प्रसिद्ध संगीतकार हितेश मोडक यानेही या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेता आकाश ठोसरने या गाण्यावर ‘कडक’ अशी कमेंट केली आहे. त्याबरोबर त्याने ‘फायर’चे काही इमोजीही शेअर केले आहे. आकाशच्या या कमेंटवर हितेशनेही प्रतिक्रिया दिली आहे. ‘धन्यवाद भावा’, अशी कमेंट हितेशने हार्ट इमोजी पोस्ट केला आहे.

आणखी वाचा : ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटकाचे प्रयोग अचानक रद्द, कारण उमेश कामतला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मंदार चोळकर याने हे गाणं लिहिले आहे. तर संगीतकार हितेश मोडक याने हे गाणं संगीतबद्ध केले आहे. तर अमेय खोपकर यांचा मुलगा ईशान खोपकर याने या गाण्याचे संकलन आणि निर्मिती केली आहे.