अमेय वाघ आणि अमृता खानविलकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला लाइक आणि सबस्क्राइब हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या हे कलाकार चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहेत. आता त्या निमित्ताने अमृता खानविलकर आणि अमेय वाघ यांनी नुकतीच ‘अल्ट्रा बझ मराठी’ला नुकतीच मुलाखत दिली. या चित्रपटात गौतमी पाटील एका गाण्यात अमेय वाघबरोबर दिसणार आहे. तिच्याबरोबर डान्स करण्याचा अनुभव कसा होता, याबद्दल या अभिनेत्याने वक्तव्य केले आहे.

‘लाइक आणि सबस्क्राइब’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने ‘अल्ट्रा बझ मराठी’ला नुकतीच मुलाखत दिली. अमेय वाघ, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे व जुई भगत हे कलाकार चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.

गौतमी पाटीलबरोबर डान्स करण्याचा अनुभव कसा होता?

या मुलाखतीत अमेय वाघला विचारले की, चित्रपटात तू गौतमीबरोबर डान्स केला आहेस. तर, तुझा अनुभव कसा होता? यावर उत्तर देताना म्हटले, “मी चित्रपटाचे कथानक आधी ऐकले होते. पण सर जेव्हा मला असे म्हणाले की, आपल्याला एक आयटम नंबर करायचं आहे. ते आपल्या सिनेमाला साजेसं आहे. परिस्थिती अशी आहे की, गावातील एक नेता कार्यक्रम ठेवतो. त्यामध्ये तो एका सेलिब्रिटीला बोलावतो. तिच्याबरोबर गावातील एक तरुण स्टेजवर जाऊन नाचतो.”

“या गाण्यासाठी विविध व्यक्तींच्या नावांचा विचार चालू होता. ज्यावेळी गौतमी पाटीलचे नाव समोर आले, त्यावेळी ती या गाण्यासाठी परफेक्ट आहे, असे मी सांगितले. कारण- गौतमीचा चाहतावर्ग मोठा आहे. अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच ती आवडते. तिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होते. सोशल मीडियावरदेखील तिचा मोठा चाहतावर्ग आहे, हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे.”

हेही वाचा: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा MMS झाला लीक, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; उत्तर देत म्हणाली, “एन्जॉय”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना त्याने म्हटले, “आम्ही तीन-चार दिवस त्या गाण्याची रिहर्सल केली. त्यातील साडेतीन दिवस मी रिहर्सल केली, तर गौतमीनं अर्धा दिवस केली. गाण्याचे जे रिटेक्स झाले, ते माझ्यामुळे झाले. जे ओके झाले, ते गौतमीमुळे झाले. आम्ही दोन दिवस नाचत होतो. माझ्यामुळे गौतमीला खूप नाचावं लागलं. पण तुम्ही गाणं बघा, मी गौतमीच्या तोडीस तोड तिथे नाचलो आहे. जे गौतमीचे चाहते आहेत, जे लाडके प्रेक्षक आहेत. त्यांच्या वतीने मी नाचलो आहे. कारण- प्रत्येकाला गौतमीचा डान्स बघताना वाटत असतं की, आपल्याला कधीतरी तिच्याबरोबर डान्स करायला मिळावा.”
दरम्यान, ‘लाइक आणि सबस्क्राइब’ चित्रपटातील ‘लिंबू फिरवलं’ या गाण्यात अमेय आणि गौतमी एकत्र दिसले आहे. हा चित्रपट शुक्रवारी (१८ ऑक्टोबर) प्रदर्शित होणार आहे.