राज्यभरात गेले १० दिवस मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दहा दिवस मनोभावे पूजा केल्यावर आता लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाईल. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरीदेखील बाप्पाचं आगमन झालं होतं. बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेले होते.

हेही वाचा : अभिनय क्षेत्र गाजवणाऱ्या सई ताम्हकरने युट्यूब चॅनेल का सुरु केलं?, म्हणाली…

मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांना ‘वर्षा’ बंगल्यावरील गणेशोत्सवाचं आमंत्रण देण्यात आलं होतं. ‘बाईपण भारी देवा’ फेम मराठी अभिनेत्री सुकन्या मोनेही बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. दर्शन घेतल्यावर अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या भेटीचा अनुभव सांगितला आहे.

हेही वाचा : Chandramukhi 2: कंगना रणौतला मोठा झटका; ‘चंद्रमुखी २’ प्रदर्शित होताच झाला लीक, कमाईवर होणार परिणाम?

सुकन्या मोने लिहितात, “मुख्यमंत्री श्री. एकनाथराव शिंदे, यावर्षी आपल्या श्री गणपती दर्शनाला मला आवर्जून निमंत्रित केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आपण आणि आपल्या कुटुंबाने आम्हा सगळ्या कलाकार मंडळींकडे जातीने लक्ष दिलेत त्याबद्दल आभार. आपल्या सौ. नी त्या माझ्या पूर्वीपासून fan आहेत हे सांगून मला सुखावले. पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार! गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!”

हेही वाचा : “तडजोडी कराव्या लागतात”, स्मिता गोंदकरने लग्नाविषयी मांडलं स्पष्ट मत; म्हणाली, “मला आता…”

View this post on Instagram

A post shared by Sukanya Kulkarni Mone (@sukanyamoneofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी यावेळी नम्रता संभेराव, स्पृहा जोशी, गौरव घाटणेकर, दीपाली सय्यद, ओंकार भोजने, मंगेश देसाई, हेमांगी कवी, पृथ्वीक प्रताप, हार्दिक जोशी, अक्षया देवधर, अमृता खानविलकर, सचिन गोस्वामी, रसिका वेंगुर्लेकर, सुकन्या मोने, जयंत वाडकर असे अनेक कलाकार उपस्थित होते.