मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. भूषण प्रधानचा ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित झाला. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, समीर धर्माधिकारी, गिरीश ओक, विजय निकम अशी तगडी स्टारकास्ट आहे.

‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाच्या प्रमोशन्ससाठी भूषण आणि अनुषा अनेक ठिकाणी एकत्र दिसले. त्यांच्या या जोडीला प्रेक्षकांचं अजूनही खूप प्रेम मिळतंय. चित्रपटात ऑनस्क्रीन यांचं नातं नवरा बायकोचं दाखवलं आहे. तसंच ऑफ स्क्रीनदेखील दोघांचं नातं खूप खास आहे असं म्हटलं जातंय. दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

हेही वाचा… “त्याच्याकडे जेवढे पैसे होते ते…”, मृण्मयी देशपांडेने सांगितला सुनील बर्वेंबरोबरचा कुंकू मालिकेतील ‘तो’ अनुभव

भूषण प्रधानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात भूषणने अनुषा दांडेकर आणि त्याचे रोमॅंटिक फोटोज शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये भूषणने फिकट तपकिरी रंगाचा सूट घातला आहे, तर अनुषाने लाल रंगाचा वन शोल्डर हाय स्लीट ड्रेस परिधान केला आहे. गोल्डन ज्वेलरी, गोल्डन हिल्स यांची निवड करत अनुषाने हा लूक पूर्ण केला आहे.

भूषण आणि अनुषाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटापासून या दोघांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. “लवकरच लग्न करणार तुम्ही दोघं” अशी कमेंट एका चाहत्याने केली, तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “तुम्हाला लग्न करण्यापासून नक्की कोण थांबवत आहे.” तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “लवकर लग्न करा.”

तुम्ही दोघं एकत्र खूप क्यूट दिसता असं एकाने कमेंट करत लिहिलं. कृपया लवकर एकमेकांशी साखरपुडा करून घ्या, असंही एक जण म्हणाला. “जोडी परफेक्ट आहे”, “अनुषासाठी खूप खूश आहे. शेवटी तिला तिच्यासारखाच जोडीदार मिळाला. तुम्हाला खूप शुभेच्छा”, अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

हेही वाचा… “मला पाकिस्तानकडून खूप प्रेम…”, सीमेपलीकडे होतंय संजय लीला भन्साळींच्या ‘हीरामंडी’चं कौतुक, म्हणाले…

अनेकदा दोघं एकमेकांबरोबर फिरतानादेखील दिसले आहेत. नुकताच अनुषाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर भूषण आणि तिचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती भूषणला, “तू खूप क्यूट आहेस” असं म्हणताना दिसतेय.

हेही वाचा… ठरलं तर मग: सुभेदार कुटुंबासमोर प्रिया उघड करणार सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य? पाहा प्रोमो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भूषण आणि अनुषाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर ‘बॉस माझी लाडा’ची मालिकेतील अभिनेत्री भाग्यश्री लिमये हिच्याबरोबर भूषणचं अनेकदा नाव जोडलं गेलंय. ते दोघं एकमेकांना डेट करतायत याच्याही चर्चा सुरू होत्या. तर अनुषा दांडेकर अभिनेता करण कुंद्राबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. पाच वर्षांच्या रिलेशननंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. करण कुंद्रा आता बिग बॉस-१५ ची विजेती तेजस्वी प्रकाशला डेट करत आहे.