दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा १९८९ मध्ये प्रदर्शित झालेला ‘हमाल दे धमाल’ हा एव्हरग्रीन चित्रपट आजही घराघरांत पाहिला जातो. या चित्रपटात बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते अनिल कपूर यांनी कॅमिओ केला होता. या चित्रपटाबद्दलच्या जुन्या आठवणी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत जयंत वाडकर यांनी सांगितल्या.

हेही वाचा : ६९ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांचा डंका; ‘गोदावरी’चे दिग्दर्शक निखिल महाजन यांनी शेअर केली खास पोस्ट

‘हमाल दे धमाल’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन आता ३४ वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाच्या जुन्या आठवणींना ‘लोकमत फिल्मी’च्या मुलाखतीत जयंत वाडकरांनी उजाळा दिला. अभिनेते म्हणाले, “‘हमाल दे धमाल’मध्ये अनिल कपूर यांनी कॅमिओ केला आहे. चित्रपटात खुद्द अनिल कपूर यांनी काम करावं अशी दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डेंची फार इच्छा होती.”

हेही वाचा : ठरलं तर मग : “मधूभाऊंची सुटका होईल का?”, जोगतीण सायलीला देणार ‘हा’ आशीर्वाद, मालिकेचा नवा प्रोमो आला समोर…

जयंत वाडकर पुढे म्हणाले, “आम्ही चित्रपटाबद्दल विचारणा करण्यासाठी अनिल कपूर यांना भेटायला गेलो. आमचा प्रस्ताव ऐकल्यावर त्यावेळी लगेच त्यांनी हा केव्हा करूया? असा प्रश्न विचारत होकार कळवला. मला अनिल कपूर लगेच हो म्हणतील याची शक्यताही वाटली नव्हती. त्यामुळे माझ्यासाठी त्यांनी या चित्रपटासाठी होकार देणं हा सुखद धक्का होता.”

हेही वाचा : “दुर्दैवाने होतं ते…” ‘विनाकारण राजकारण’साठी पुरस्कार मिळाल्यानंतर रुपाली भोसले असं का म्हणाली?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्या माणसाने ‘हमाल दे धमाल’ या चित्रपटासाठी एकही पैसा न घेता कॅमिओ केला होता. तशा प्रकारचं बॉण्डिंग किंवा नातं आता तुम्हाला पाहायला मिळणार नाही.” असं जयंत वाडकरांनी सांगितलं. दरम्यान, मध्यंतरी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देताना अनिल कपूर यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबरचा खास फोटो शेअर करत ‘हमाल दे धमाल’च्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. “माझा मित्र लक्ष्मीकांत.. मला त्याची रोज आठवण येते” अशी भावुक पोस्ट त्यांनी शेअर केली होती.