मराठी अभिनेता हेमंत ढोमे चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. हेमंत हा एक उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. हेमंतचा सर्वात पहिला आणि गाजलेला चित्रपट म्हणजे ‘क्षणभर विश्रांती’. या चित्रपटातून हेमंत हा प्रसिद्धीझोतात आला. आज या चित्रपटाला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत.

‘क्षणभर विश्रांती’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या चित्रपटात हेमंत ढोमे, सिद्धार्थ जाधव, सचित पाटील, कादंबरी नाईक, पूजा सावंत, सोनाली कुलकर्णी प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट आणि त्यातली गाणी आजही प्रेक्षक विसरू शकले नाहीत. अभिनेता आणि लेखक म्हणून हा हेमंतचा पहिला चित्रपट होता. त्यानिमित्ताने त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार २५ वर्षांपूर्वी कसे दिसायचे? फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

“‘क्षणभर विश्रांती’ या माझ्या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, काही चित्रपट असे असतात जे प्रदर्शना नंतर नाही तर टिव्ही वर ओटीटी वर आल्यावर सुपरहिट होतात! आपल्या या सुपरहिट सिनेमाला आज १३ वर्ष झाली प्रदर्शित होऊन! आजही लोक भेटतात, प्रेमाने बोलतात!
हा चित्रपट मला लिहीता आला, त्यात काम करता आलं आणि खूप साऱ्या गुणी मित्रांसोबत काम करता आलं… कमाल!
तुमचं प्रेम असंच राहूदे!
धन्यवाद माझी संपूर्ण टिम आणि धन्यवाद प्रेक्षक!” असे हेमंत ढोमेने म्हटले आहे.

आणखी वाचा : “तुझी मिशी…” भर शूटिंगमध्ये हेमंत ढोमेने शिवानी सुर्वेला सोडलं होतं फर्मान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेमंतने या पोस्टबरोबरच या चित्रपटातील एका सीनचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. यात तो, कादंबरी नाईक आणि सिद्धार्थ जाधव पाहायला मिळत आहे. हेमंत ढोमेच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. तसेच अनेक कलाकारांनी त्याच्या पोस्टवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.