घरात कॉफी बनवल्यावर तिचा दरवळ जसा घरभर पसरतो, तसाच आता रंगभूमीवर कॉफीचा दरवळ पसरणार आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही ‘फिल्टर कॉफी’ नाट्यरसिकांसाठी आणली आहे. अद्वैत आणि अश्वमी थिएटर्स प्रकाशित महेश वामन मांजरेकर सादर करीत असलेली ही तजेलदार कॉफी ६ एप्रिलला रंगभूमीवर येणार आहे. या नाटकाचं लेखन सुद्धा स्वत: महेश मांजरेकर यांनी केलेलं आहे.

‘फिल्टर कॉफी’ या नाटकांचे निर्माते दिलीप माधव जगताप असून सहनिर्माते राहुल भंडारे आहेत. ‘फिल्टर कॉफी’ नाटकात विराजस कुलकर्णी, विक्रम गायकवाड, कुणाल मेश्राम, अंकिता लांडे आणि उर्मिला कानेटकर यांच्या भूमिका आहेत.

याप्रसंगी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, “१९९२ साली मला हे नाटक करायचं होतं. त्यावेळी ते शक्य झालं नाही आता हे नाटक मी रंगभूमीवर आणतोय आणि ते स्वतः दिग्दर्शित करतोय. कॉफीच्या गडद रंगाप्रमाणे या नाटकाची गडद शेड नाट्य रसिकांना अनुभवायला मिळेल.” सस्पेन्स थ्रिलर असं हे नाटक आहे. मराठी नाट्यरसिक प्रगल्भ आहे. वेगळ्या संहिताचं स्वागत त्यांनी नेहमीचं केलं आहे. माझ्या सोबतीने निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञ अशी आम्ही सगळ्यांनी मिळून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी आणलेली कडू-गोड चवीच्या ‘फिल्टर कॉफी’ची ट्रीट नाट्यरसिक नक्कीच एन्जॉय करतील असा विश्वास महेश मांजरेकर यांनी व्यक्त केला आहे.

या नाटकाविषयी बोलताना अभिनेता विराजस कुलकर्णी म्हणाला, “वैविध्यपूर्ण नाटक मराठी रंगभूमीवर येतायेत त्याला नाट्यरसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. रंगभूमीमुळे मराठी चित्रपटसृष्टीला एक वेगळी ओळख मिळतेय. नाटक हे नेहमी दिग्दर्शकाचं मानलं जातं. दिग्दर्शकाच्या नावामुळे नाट्यरसिक नाटक पाहायला येतात. महेश मांजरेकर यांचं नाव त्यात अग्रस्थानी आहे. त्यांच्या कलाकृती पाहत मी मोठा झालोय. त्यांच्या सोबत काम करण्याची संधी दवडणे शक्य नव्हतं. आम्ही घेऊन येत असलेलं हे नाटक थ्रिलर जॉनरच असून काहीतरी वेगळं नाट्यरसिकांना पाहायला मिळणार याची खात्री देतो.”

माझी ही पहिली नाट्यकृती असून महेश मांजरेकर यांच्यासारख्या दिग्ग्ज दिग्दर्शकासोबत काम करणं ही माझ्यासाठी पर्वणी होती. या नाटकाच्या निमित्ताने माझी नाटक करायची इच्छा पूर्ण झाली याचा आनंद असल्याचे अभिनेत्री उर्मिला कानेटकर हिने यावेळी सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Virajas Kulkarni (@virajas13_official)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘फिल्टर कॉफी’ या नाटकाचे सहलेखन अभय देखणे तर सहाय्यक दिग्दर्शक सुरज कांबळे आहेत. संगीताची जबाबदारी हितेश मोडक यांनी सांभाळली आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे तर नेपथ्य संदेश बेंद्रे यांचं आहे. वेशभूषा लक्ष्मण येलप्पा गुल्लार यांची आहे. दिपक कुलकर्णी यांचं विशेष सहकार्य या नाटकासाठी लाभलं आहे.