रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने उपांत्य फेरीत इंग्लंडचा तब्बल ६८ धावांनी पराभव करत टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. आता भारताची अंतिम लढत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. उपांत्य फेरीतल्या विजयानंतर भारताचे सगळेच खेळाडू भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. यापूर्वी एक दिवसीय विश्वचषक जिंकायचं भारताचं स्वप्न ऑस्ट्रेलियामुळे अपूर्ण राहिलं आहे. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे जगभरातील लाखो क्रिकेटप्रेमींचं आणि भारतीय प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करणाऱ्या टीम इंडियाचं आता सर्व स्तरांतून कौतुक केलं जात आहे. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार सुद्धा नित्य नियमाने क्रिकेट जगतात काय चालू आहे याकडे लक्ष ठेवून असतात. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत आली आहे.

मराठी नाटक असो किंवा चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हृषिकेश जोशी यांनी प्रत्येक माध्यमांत आपला ठसा उमटवला आहे. ‘पोस्टर गर्ल’, ‘यलो’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘दे धक्का’, ‘देऊळ’ अशा बऱ्याच लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

हेही वाचा : शिवानी सुर्वेचं जोरदार पुनरागमन! TRP मध्ये घेतली मोठी झेप, पहिल्याच आठवड्यात गाठलं ‘हे’ स्थान, पाहा संपूर्ण यादी

अभिनेता हृषिकेश जोशी यांनी भारतीय टीमचं कौतुक करत एक खास पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. “रोहित, सूर्याचे ‘हार्दिक’ अभिनंदन ‘अक्षर’श: कमाल…आफ्रिका घाबरायचं बरं का…” अशी पोस्ट शेअर करत हृषिकेश जोशी यांनी टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. शिवाय आफ्रिकेच्या संघाला आमच्या टीमपासून सावध राहा असा सूचक इशारा अभिनेत्याने ही पोस्ट शेअर करत दिला आहे.

हृषिकेश जोशी यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. “आफ्रिका पण चांगला प्रतिस्पर्धी संघ आहे त्यामुळे यंदा अतिआत्मविश्वास नको”, “कमाल आहे पुन्हा एकदा स्पिनरची जादू चालणार”, “ही पोस्ट ‘अक्षर’श: पटेल सर्वांना” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत. आता सगळ्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष शनिवारी होणाऱ्या अंतिम सामन्याकडे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : आमिर खानने मुंबईत घेतली कोट्यवधींची मालमत्ता; स्टॅम्प ड्युटी ५८ लाख, तर अपार्टमेंटची किंमत तब्बल ‘इतके’ कोटी

hrishikesh joshi
मराठी अभिनेते हृषिकेश जोशी यांची पोस्ट

दरम्यान, इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात यश मिळवल्यावर भारतीय कर्णधार रोहित शर्मा ड्रेसिंग रुममध्ये भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. व्हायरल फोटोंमध्ये तो डोळ्यावर हात घेऊन बसला असल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी बाजूला उभा असलेल्या विराट कोहलीने त्याला धीर दिला.