कोकणात गणेशोत्सव आणि शिमगा या दोन सणांना विशेष महत्त्व आहे. मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांचं मूळ गाव कोकणात आहे. त्यामुळे लागोपाठ सुट्ट्या आल्या की, हे कलाकार कोकणात पोहोचतात. कोकणातील संस्कृती, हिरवागार निसर्ग, खळखळ वाहणाऱ्या नद्या याबद्दल प्रत्येकालाच आकर्षण असतं. अलीकडेच गणेशोत्सवानिमित्त मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता त्याच्या मूळ गावी पोहोचला आहे. अभिनेत्याने शेअर केलेला निसर्गरम्य कोकणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “तुमचं चोप्रा कुटुंबामध्ये स्वागत…”, परिणीती-राघवसाठी प्रियांका चोप्राची खास पोस्ट; म्हणाली…

‘झेंडा’, ‘मोरया’, ‘रेगे’ या चित्रपटांमधून घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. सध्या शूटिंगमधून वेळ काढत संतोष त्याच्या गावी कोकणात फिरायला गेला आहे. अभिनेत्याने त्याच्या गावचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये संतोष रानात हिंडताना, मित्रांसह नदीत पोहोत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : सुभेदार चित्रपटानंतर मराठमोळ्या मृण्मयी देशपांडेची सुपरहिट हिंदी वेबसिरीजमध्ये एन्ट्री; पोस्टर प्रदर्शित

“कोकण माझं, गाव माझं…खूप काही मनात होतं. माझ्या गावचा माझ्या कोकणाचा दट्ट्या दिला आणि सगळं एकदम मोकळ मोकळ झालं, आता नव्याने भरभरून वहायला मी मोकळा झालो. पावसात भिजलो, रानात हिंडलो, नदीत पोहोलो, चुलीवरचा भात, माश्याचं सार आणि तुकडी… असं अस्सल meditation करून आलो. आता मन आणि शरीर दोनीही Detox झालंय एकदम”, असं कॅप्शन अभिनेत्याने या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा : “आईला अगदी पटकन…”, सखी-सुव्रतच्या नात्याबद्दल काय होती शुभांगी गोखलेंची पहिली प्रतिक्रिया, अभिनेत्री म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संतोष जुवेकरचं अलीकडेच ‘गोविंदा आया…’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. गेल्या महिन्यात त्याचा ‘डेट भेट’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता हेमंत ढोमेने प्रमुख भूमिका साकारली होती.