गेले अनेक महिने ‘सुभेदार’ या मराठी चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. २५ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून या चित्रपटातून सुभेदार तानाजी मालुसरे यांचा पराक्रम आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर आता या चित्रपटाने आठ दिवसांत किती कमाई केली याचा आकडा समोर आला आहे.
सुभेदार चित्रपटाचे शो हाऊसफुल होत आहेत. या चित्रपटातील कलाकारांच्या कामाचं, कथेच्या मंडळीचं, सर्वजण कौतुक करत आहेत. त्यामुळे या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात दमदार कामगिरी केली आहे.
या चित्रपटाला एकूण मिळणारा प्रतिसाद बघता हा चित्रपट किती कमाई करत आहे याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. तर आता या चित्रपटाच्या टीमनेच त्याबद्दलची माहिती सर्वांची शेअर केली आहे. या चित्रपटाच्या टीमने एक व्हिडिओ पोस्ट करत या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात किती गल्ला जमवला हा आकडा सर्वांशी शेअर केला आहे. त्यानुसार या चित्रपटाने ८.७५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटाचा या यशस्वी कामगिरीबद्दल सर्वच कलाकार खूप खुश आहेत.
दरम्यान, या चित्रपटामध्ये मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.