मराठी सिनेसृष्टीतील अनेक ज्येष्ठ कलाकार हे सध्या कामाच्या शोधात फिरत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध लावणी सम्राज्ञीवर बसस्टॉपवर भीक मागण्याची वेळ आली होती. त्यानंतर आता ज्येष्ठ मराठी अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी काम मिळत नसल्याची तक्रार केली आहे. तसेच एकटेपणाला कंटाळून इच्छामरण तरी द्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे. प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावालकरने याबद्दलचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

अंकिताने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती गिरगावमध्ये एका शूटसाठी गेली होती. त्यावेळी तिची भेट माहिमकर काकांशी झाली. यानंतर मनमोहन माहिमकर यांनी तिच्यासमोर मराठी सिनेसृष्टीतील वास्तव मांडले आणि त्यांची व्यथा सांगितली. त्यामुळे अंकितालाही धक्का बसला.
आणखी वाचा : “इंग्रज कोकणस्थ ब्राह्मणांना आपली औलाद म्हणून सोडून गेले”, म्हणणाऱ्याला मराठी अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, “ही भाषा…”

या व्हिडीओत अंकिता म्हणाली की, “गिरगावमध्ये माझं एक शूट होतं आणि ते सुरु असताना मला माहिमकर काका भेटले. ज्यांना मी लहानपणापासून स्क्रीनवर पाहत आली आहे. मी त्यांना विनंती केली की आमच्या शूटमध्ये तुम्ही याल का? ते लगेच तयार होऊन आले.”

“यानंतर मी निघत असताना ते मला म्हणाले, मुली मला काम देशील का गं. मला कामाची खूप गरज आहे. त्यांच्या डोळ्यातील पाणी बघून मला फार वाईट वाटलं. आज एका कलाकाराची अशी अवस्था आहे की ते माझ्याकडे काम मागत होते. माझं लग्न झालं नाही, माझ्याकडे वेळ घालवायला माझं कुटुंब नाही. मला इच्छामरण सुद्धा चालेल पण त्याचा अर्ज मी इथे भारतात देऊ शकत नाही. मला काम द्या जेणेकरुन माझा वेळ जाईल आणि मी त्यातून काहीतरी पैसे कमवू शकेल. मला फक्त पैसे नकोत तर काम करायचं आहे.

त्यांची या वयातील ही वाक्य ऐकून त्यांच्याकडून खरंच बरंच शिकण्यासारखं आहे. मी त्यांना सांगितलं की मी एवढी मोठी नाही की मी तुम्हाला काम देऊ शकेन, पण माझ्या संपर्कात असलेल्या सिनेसृष्टीतील लोकांपर्यंत मी तुमचा हा मेसेज नक्की पोहोचवेन. तुम्हाला नक्की काम मिळेल जेणेकरुन तुमचा वेळ जाईल. तुमचं शेवटचं आयुष्य खूप सुखात जाईल”, असे अंकिताने या व्हिडीओत म्हटले आहे.

आणखी वाचा : “खरंतर ऐन उन्हाळ्यात चित्रपट प्रदर्शित करायला हवा होता…”, संजय मोने यांची पोस्ट; म्हणाले “नाव ‘बाईपण भारी देवा’ असलं तरी…”

आणखी वाचा : “हे बनवणाऱ्या व्यक्तीच्या…” मेट्रोमोनियल साईटवरील फेक अकाऊंट पाहताच वीणा जगतापचा संताप, म्हणाली “गेल्यावर्षीही…”

“माझ्यासाठी रखुमाई बनून उभी रहा मुली. मला काम हवंय!! ही वाक्य मला झोपू देणार नाहीत, त्यामुळेच मी रिल करायचं ठरवलं”, असे कॅप्शन अंकिताने या व्हिडीओला दिले आहे. तिच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. मेघना एरंडे, अद्वैत दादरकर, धैर्य घोलप, अमित अवंती यांसारख्या अनेक कलाकारांनी यावर हार्ट इमोजी शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मनमोहन माहिमकर यांनी ‘नानामामा’, ‘गोलमाल’, ‘जत्रा’, ‘भिकारी’, ‘ही पोरगी कोणाची’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘वंटास’ यासारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबरच काही नाटकातही ते झळकले होते.