महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीतील एक अभिनेता म्हणजे प्रसाद ओक. गेली अनेक वर्षं तो त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. नाटक असो, मालिका असो किंवा चित्रपट असो; त्याच्या प्रत्येक भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतुक केलं. त्याच्या इतक्या वर्षांच्या कारकीर्दीत त्याला अनेक पुरस्कारही मिळाले. ते पुरस्कार ठेवण्यासाठी त्याने नवीन घर घेतलं आहे का? याचं उत्तर त्याने नुकतंच दिलं. प्रसाद ओकची प्रमुख भूमिका असलेला 'धर्मवीर' हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. या चित्रपटातील त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं. तर आता या चित्रपटासाठी नुकताच त्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. आणखी वाचा : प्रसाद ओक व सई ताम्हणकरला हात जोडून मागावी लागली माफी, नेमकं प्रकरण काय? हा पुरस्कार घेतानाचा एक व्हिडीओ प्रसादने नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला. या व्हिडीओत तो फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारताना दिसत आहे. हा पुरस्कार घेतल्यावर निवेदकाने त्याला विचारलं, "प्रसाद ओकला या चित्रपटासाठी जे काही पुरस्कार मिळाले आहेत ते ठेवण्यासाठी त्याने नवीन घर घेतलं आहे असं आमच्या कानावर आलं आहे. हे खरं आहे का?" त्यावर उत्तर देत प्रसाद गमतीत म्हणाला, "तथास्तु. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होवो." हेही वाचा : “आधी माझ्याकडे खूप पैसे होते, पण…”; प्रसाद ओकचा व्हिडीओ चर्चेत हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करत प्रसादने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "अजून एक BLACK LADY घरात…!!! तीही अशा LADY च्या हातून जिचा मी लहानपणापासून चाहता आहे. THE GORGEOUS अश्विनी भावे. पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार टीम धर्मवीर, मंगेश देसाई आणि अर्थातच प्रवीण तरडे…!!!" आता त्याची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून यावर त्याचे चाहते, त्याचबरोबर मनोरंजनसृष्टीतील त्याची मित्रमंडळी कमेंट करत त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.