अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत यांची जोडी मराठी मनोरंजनसृष्टीत प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांनीही एकमेकांना जवळपास ८ वर्ष डेट केल्यावर २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. चित्रपट, मालिका, नाटक, वेबसीरिज अशा चारही माध्यमांतून दोघंही प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. सध्या त्यांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाची जोरदार चर्चा सुरु आहे. या नाटकाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अलीकडेच प्रिया-उमेश रेडिओ सिटीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी प्रियाने उमेशचं भरभरून कौतुक केलं.

हेही वाचा : “मला जराही भीती…”, ‘जवान’मधील व्हायरल डायलॉगनंतर समीर वानखेडेंनी शाहरुख खानला दिलं चोख प्रत्युत्तर?

प्रिया नवऱ्याबद्दल सांगताना म्हणाली, “उमेशबद्दल एक गोष्ट मी आवर्जून सांगणार आहे. ही गोष्ट कोणालाच नाही माहिती…माझ्या सोशल मीडियावर ज्यांनी पाहिलं असेल फक्त त्यांनाच माहिती असेल. मला काही दिवसांपूर्वी खूप ताप आला होता आणि मला माझ्या आईच्या हातचा शिरा खायची खूप इच्छा झाली होती. आता माझ्यासाठी आईसारखा शिरा कोण करणार? हा प्रश्न आमच्यापुढे होता कारण, माझे बाबा सुद्धा ताईकडे राहायला गेले होते.”

हेही वाचा : Video : सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं हक्काचं घर, जुन्या घराला ‘गुडबाय’ करताना म्हणाली “भूतकाळातील…”

प्रिया पुढे म्हणाली, “माझी शिरा खायची इच्छा पाहून उमेश स्वत:हून शिरा करण्यासाठी तयार झाला. मीच त्याला नको म्हणाले कारण, त्याला सगळ्या गोष्टी मला किचनमध्ये जाऊन सांगाव्या लागतील. यावर उमेश मला म्हणाला, तू अजिबात हलायचं नाही बेडरुममधून…सगळ्या गोष्टी मला व्हॉट्सअ‍ॅपला मेसेज करून सांग. मी सगळं त्याला पाठवलं आणि उमेशने खरंच इतका सुंदर शिरा बनवला होता काय सांगू?…खरंच सुंदर झाला होता मी कधीच विसरु शकत नाही.”

हेही वाचा : नाना पाटेकरांनी अवघ्या ७५० रुपयांत केलेलं लग्न, बँकेत होत्या त्यांच्या पत्नी; असं काय झालं की वेगळे राहतात दोघं, जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उमेशने बनवलेल्या शिऱ्याला आईच्या हातंची चव असल्याचं प्रियाने मान्य केलं आणि त्या शिऱ्यात त्याचं खूप जास्त प्रेम होतं असं सांगत अभिनेत्रीने नवऱ्याचं कौतुक केलं. दरम्यान, प्रिया-उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून यामध्ये प्रिया-उमेशसह पल्लवी अजय आणि आशुतोष गोखले यांच्या प्रमुख भूमिका आहेत.