मराठीसह हिंदी कलाविश्वात आपला ठसा उमटवणारे लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून रवी जाधव यांना ओळखलं जातं. ‘मैं अटल हूं’, ‘ताली’, ‘बालक पालक’, ‘टाईमपास’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून दिग्दर्शक ‘मैं अटल हूं’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होते. त्यामुळे अलीकडेच शूटिंगमधून वेळात वेळ काढून ते गावच्या घरी पोहोचले होते.

रवी जाधव यांनी इन्स्टाग्रामवर कोकणातील त्यांच्या गावच्या घराची संपूर्ण झलक शेअर केली आहे. यामध्ये वाहती नदी, कौलारू घर, आंबा-सुपारीच्या बागा, तुळस, सुंदर असा रस्ता, गावचं भजन, कोकणात साजरा होणार माघी गणेशोत्सव याची सुंदर अशी झलक पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : हिरवी साडी, नाकात नथ अन्…; पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, पहिला फोटो आला समोर

रवी जाधव गावच्या घराचा हा व्हिडीओ शेअर करत लिहितात, “गावी गेलं का मन बेभान होतं आणि गहीवरतही…माघी गणेशोत्सवाला संगमेश्वर तालुक्यातील कासे या माझ्या गावी गेलो की पुन्हा मुंबईला येऊच नये असं वाटतं.”

हेही वाचा : “२०१४ पासून फक्त दोन वेळा…”, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला किस्सा; पत्नी व लेकीबद्दल म्हणाले, “आम्ही तिघेही…”

View this post on Instagram

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिग्दर्शकाने शेअर केलेल्या या सुंदर व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. एक युजर लिहितो, “गाव कोकणात असो वा देशावर त्याची जागा व ओढ आपल्या प्रत्येकाच्या हृदयात कायमच असते.” तसेच अन्य काही युजर्सनी “गाव म्हणजे स्वर्ग”, “कोकण म्हणजे निसर्गाचा आनंद” अशा कमेंट्स रवी जाधव यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर केल्या आहेत.