सिद्धार्थ चांदेकर व सई ताम्हणकर मराठी मनोरंजसृष्टील लोकप्रिय कलाकार आहेत. आत्तापर्यंत दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. क्लासमेट चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. आता पुन्हा एकदा सिद्धार्थ व सईची जोडी चित्रपटगृहांमध्ये धमाल उडवून देणार आहे. ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपटातून दोघे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. प्रेक्षकांकडून या टीझरला भरभरून प्रतिसाद मिळाला होता. प्रेम, लग्न, कमिटमेंट, संसार अशा विषयांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात सिद्धार्थ ‘प्रसन्न’, तर सई ‘श्रीदेवी’ ही भूमिका साकारणार आहे. २ फेब्रुवारीला हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. सिद्धार्थ-सईने आपल्या इन्स्टाग्रामवरुन हा ट्रेलर शेअर केला आहे.

काय आहे ट्रेलरमध्ये?

ट्रेलरच्या सुरुवातीलाच सिद्धार्थ म्हणजे प्रसन्नची आई त्याच्या लग्नासाठी मागे लागताना दिसते. तर सई म्हणजे श्रीदेवी लग्न करायला उत्सुक असल्याची बघायला मिळाली. अरेंज मॅरेजपद्धतीने लग्न करण्यासाठी दोघे एकमेकांना भेटतात आणि तिथून सुरु होते दोघांची अरेंजवाली लव्हस्टोरी. मात्र, श्रीदेवीच्या आजीमुळे कथेत येतो एक ट्विस्ट. आता प्रसन्न-श्रीदेवीचे लग्न जुळणार का? दोघे नवरा-बायको बनणार का? हे तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच लक्षात येईल.

हेही वाचा- तेजस्विनी पंडित झळकणार ‘या’ ऐतिहासिक चित्रपटात; पोस्टर शेअर करीत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीप्स मराठी प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती कुमार तौरानी यांनी केली आहे. या चित्रपटात सई व सिद्धार्थ यांच्याबरोबर संजय मोने, शुभांगी गोखले, समीर खांडेकर, रसिका सुनील, वंदना सरदेसाई, पूजा वानखडे, रमाकांत डायमा, सुलभा आर्या, पल्लवी परांजपे, सिद्धार्थ महाशब्दे, सिद्धार्थ बोडके, जियांश पराडे यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.