मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सई ताम्हणकर हीचं नाव कायमच वरच्या स्थानी असतं. आता फक्त मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही तिने तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. २०२२ हे वर्ष तिच्यासाठी खूप खास ठरलं. यावर्षी तिच्या कामासाठी तिला अनेक मानाचे पुरस्कार मिळाले. तर या वर्षाने तिला काय शिकवलं हे तिने नुकतच सांगितलं आहे.

२०२२ साली सई वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला आली. सोशल मीडियावरही ती नेहमीच सक्रिय असते. तिच्या कामाबरोबरच तिच्या ग्लॅमर फोटोंमुळे बऱ्याचदा ती चर्चेचा विषय ठरते. तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठीही तिचे चाहते खूप उत्सुक असतात. अनेक सेलिब्रिटी नवीन वर्षाचे संकल्प करत आहेत तसंच २०२२ ने त्यांना काय शिकवलं हे शेअर करत आहेत. सई ताम्हणकरही यात मागे नाही. नुकतीच तिने ‘फ्री प्रेस जर्नल’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने २०२२ ने तिला काय शिकवलं हे सांगितलं आहे.

आणखी वाचा : केतकी चितळेला राग अनावर! ट्रोलरला शिवी देत म्हणाली, “तुमच्या पिढीला…”

हेही वाचा : “मी आयुष्याची वाट लावून घेतली होती त्याला आई जबाबदार…” प्रतीक बब्बरचा धक्कादायक खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सई म्हणाली, “मी एक अभिनेत्री आहे आणि त्यामुळे मला बरेच लोक फॉलो करत असतात. जेव्हा तुम्ही एखादी पब्लिक फिगर असता तेव्हा तुम्हाला व्यक्त होताना १० हजार वेळा विचार करावा लागतो. हे मला २०२२ ने शिकवलं. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही अपेक्षा ठेवणं बंद करता तेव्हा बरंच काही घडतं, हेही मी २०२२ मध्ये शिकले. यावर्षी मी हे आचरणात आणण्याचा प्रयत्न करणार आहे.”