‘सैराट’ चित्रपटात आर्चीची भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजेच रिंकू राजगुरू. रिंकूने तिच्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपला पाय रोवला आहे. अशी ही हरहुन्नरी कलाकार सध्या चर्चेत आहे.

नुकताच १६ जून रोजी ‘फादर्स डे‘ पार पडला. यादिवशी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या वडिलांसाठी खास पोस्ट शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या खास दिवशी रिंकूने तिच्या वडिलांसह एका मुलाखतीला हजेरी लावली. या मुलाखतीत तिच्या वडिलांनी होणाऱ्या जावयाविषयीच्या आपल्या अपेक्षा सांगितल्या.

हेही वाचा… ‘ठरलं तर मग’ या मालिकेतील सायलीच्या भूमिकेसाठी जुई गडकरीला ‘असा’ करावा लागतो नट्टापट्टा, अभिनेत्रीने केला व्हिडीओ शेअर

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा मुलाखतदाराने रिंकूच्या बाबांना विचारलं की, “रिंकू तुमची एकुलती एक लेक आहे, मग तिच्यासाठी जावई नक्की कसा हवाय तुम्हाला? काय विचार केलाय का तुम्ही की ती ठरवेल तो मुलगा तुम्हाला मान्य असेल?”

यावर रिंकूचे बाबा महादेव राजगुरू म्हणाले, “ती ठरवेल तोच, पण तिने सांगितल्यानंतरच आम्ही निर्णय घेणार.”

हेही वाचा… “त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला अन्…, ‘बालिका वधू’ फेम आनंदीने सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग, म्हणाली…

हे ऐकताच रिंकू त्यांना म्हणाली, “जर मी म्हणाली की हा मुलगा मला आवडतो तर तुम्ही हो म्हणणार लगेच. ” तर बाबा म्हणाले नाही, “मी आधी त्याला तपासून पाहणार. जसं आम्ही तिला स्वातंत्र्य दिलं तसंच स्वातंत्र्य त्याने तिला दिलं पाहिजे. इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको असं म्हणणारा मुलगा नको. कारण हे क्षेत्रच असं आहे की, प्रत्येक ठिकाणी जावं लागणार. या गोष्टी ज्याला कळतात तोच तिला समजून घेईल. असा मुलगा असेल तर मग आम्हाला काही अडचण नाही.”

हेही वाचा… VIDEO: “वहिनी म्हणतील…”, रितेश देशमुख आणि जिनिलीयाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रिंकू राजगुरूच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर रिंकूने २०१६ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ या चित्रपटामधून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. सैराटच्या यशानंतर रिंकूने कन्नड, हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केलं. रिंकू शेवटची ‘झिम्मा-२’ या चित्रपटात झळकली होती. रिंकूचा आगामी चित्रपट ‘खिल्लार’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रिंकूसह ललित प्रभाकरदेखील झळकणार आहे; तर रिंकूचे ‘पिंगा’ आणि ‘आशा’ हे दोन चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहेत.