“बिग बी आपला मोठेपणा दाखवा”, अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर मनसेचे पोस्टर

अमिताभ यांच्या जुहूमध्ये असलेल्या प्रतिक्षा बंगल्यावर असे काही पोस्टर लावण्यात आले आहेत, ज्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

amitabh bachchan, amitabh bachchan banglow pratiksha
अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर मनसेचे पोस्टर

बिग बी अमिताभ बच्चन त्यांच्या सिनेमा आणि भूमिकांमुळे कायमच चर्चेत असतात मात्र बिग बी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. सध्या बिग बींच्या जूहू येथील प्रतिक्षा बंगल्यासमोर काही पोस्टर लागले असून या पोस्टरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. हे पोस्टर राज ठाकरे यांच्या नवनिर्माण पक्षाकडून लावण्यात आले आहेत.

बुधवारी रात्री हे पोस्टर लावण्यात आले असून यात अमिताभ बच्चन यांना त्याचं मन मोठं करण्याची विनंती करण्यात आलीय. “मोठे महानायक आपला मोठेपणा दाखवा. हिच प्रतिक्षा. संत ज्ञानेश्वर मार्गाचे रुंदीकरण करण्यास मुंबई महानगर पालिकेला आणि जनतेला सहकार्य करावे,” असं या पोस्टरमध्ये म्हण्यात आलंय. मनसे विभाग अध्यक्ष मनिष धुरी यांच्या नेतृत्वात हे पोस्टर लावण्यात आले आहेत.

आणखी वाचा : ‘मुस्लीम आहेस तू’, या आधी देखील हिंदू मंदिरात गेल्यामुळे सारा अली खान झाली होती ट्रोल

“२०१७ मध्ये पालिकेने अमिताभ बच्चन आणि त्यांच्या शेजारी असणाऱ्या इमारतींना रस्ता रुंदीकरणासाठी नोटीस दिली होती. सर्वांनीच सहकार्य केलं असून बच्चन यांनी काही उत्तर दिलेलं नाही, त्यामुळे काम रखडलं आहे. तिथे कॉलेज, शाळा, हॉस्पिटल असून प्रतिक्षा बंगल्यामुळे अडचण होत आहे. त्यामुळे आम्हाला अमिताभ बच्चन यांच्या मोठेपणाची प्रतिक्षा आहे,” असे मनिष धुरी एबीपीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

काय आहे प्रकरण?

खर तर मुंबई पालिकेकडून अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याची भिंत तोडण्याची तयारी सुरु आहे. रस्त्याच्या रुंदीकरणासाठी हे पाऊल उचलंल जात आहे. पालिकेने २०१७ साली यासाठी अमिताभ बच्चन यांना नोटीस पाठवली होती. मात्र बिग बींनी त्याला उत्तर दिलं नाही. येथील संत ज्ञानेश्वर रस्त्यांची रुंदी ४५ फूट इतकी असून तो ६० फूट रुंद करण्याची तयारी सुरु आहे. मात्र या रुंदी करणात प्रतिक्षा बंगल्याची भींत मधे येत असल्याने ती तोडावी लागणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mns posters out side of amitabh bachchan banglow pratiksha request show big heart and suppourt bmc kpw