‘सैराट’, ‘फँड्री’ असे ब्लॉकबस्टर चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला देणारा दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. विषयातले वेगळेपण आणि मांडणीतली कल्पकता यामुळे त्यांचे चित्रपट सर्वच वयोगटातल्या लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. आता नागराज यांचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन देखील दिसणार आहेत. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.

नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या चित्रपटाबाबच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाचा टीझर त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या टीझरमध्ये अमिताभ बच्चन यांची धमाकेदार एण्ट्री पाहायला मिळते. तसेच ते फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. एकंदरीत चित्रपटाचा टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर असल्याचे म्हटले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘झुंड’ चित्रपटाचा टीझर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. टीझरच्या सुरुवातीचे म्युझिक हे चर्चेचा विषय ठरला आहे. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ हा चित्रपट ४ मार्च रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु हे कलाकार देखील दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. चित्रपटाला अजय-अतुल या जोडीने संगीत दिले आहे.