भारतीय मनोरंजन विश्वात बरेच वेगवेगळे प्रयोग झाले. त्यापैकी एक प्रयोग म्हणजे अभिनेत्यांनी स्त्रीपात्र साकारणे. रंगमंचावर बालगंधर्व, चित्रपटात सचिन पिळगांवकर, टेलिव्हिजनवर सागर कारंडे अशा वेगवेगळ्या अभिनेत्यांनी उत्तमरित्या स्त्रीपात्रं साकारलं आहे. यात आता एका बॉलिवूड अभिनेत्याची भर पडली आहे. तो अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी.

नवाजुद्दीन सिद्दीकीचा आगामी ‘हड्डी’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यातून चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही माहिती मिळाली. हा चित्रपट पुढच्या वर्षी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओने मोशन पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये नवाज स्त्रीवेषात दिसला आहे. पहिल्यांदा हे पोस्टर पाहताना नवाज ओळखू येत नाही. यामुळेच सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे.

काहींनी या पोस्टरचं आणि नवाजच्या लूकचं प्रचंड कौतुक केलं आहे. तर काही लोकं या पोस्टरची खिल्लीदेखील उडवत आहेत. नेटकऱ्यांनी तर नवाजच्या पोस्टखाली कॉमेंट करून हैराण केलं आहे. लोकांचं म्हणणं आहे की “या पोस्टरमध्ये नेमकं कोण आहे? अर्चना पुरण सिंग की नवाज? ओळखणं कठीण आहे.” प्रेक्षक यावरून अर्चना पुरण सिंग यांनादेखील ट्रोल करत आहेत. याआधीसुद्धा अर्चना यांना कपिल शर्मा शोवरून प्रचंड ट्रोल केलं जायचं.

या सगळ्या प्रकाराबद्दल विचारल्यावर अर्चना म्हणाल्या, “कपिल शर्माच्या जुन्या काही भागांमध्ये माझी हेअर स्टाइल तशी असल्याने लोकं गोंधळली आहेत. नवाजसारख्या अभिनेत्याशी माझी तुलना होत असेल तर ही माझ्यासाठी अत्यंत भाग्याचीच गोष्ट आहे.” अर्चना पुरण सिंग यांनी हे वक्तव्य देत त्यांना ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना चांगलंच उत्तर दिलं आहे.

आणखीन वाचा : Amitabh Bachchan Corona Positive: अमिताभ बच्चन यांना पुन्हा करोनाची लागण, ट्वीट करत बिग बी म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवाजचा हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नवाज आजवरच्या सर्वात वेगळ्या अशा भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आहे आणि लवकरच याचा छोटासा टीझर येऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.