बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोराचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नोरा फतेहीला बॉलिवूडमधील आघाडीची डान्सर म्हणून ओळखले जाते. तिला डान्सव्यतिरिक्त ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसाठीही ओळखले जाते. नोरा फतेही ही सध्या दुबईमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहेत. तिने याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
नोरा फतेहीला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यानंतर करोनामुक्त झाल्यावर ती कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता ती दुबईमध्ये सुट्ट्या एन्जॉय करत असल्याचे दिसत आहे. नुकतंच नोराने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
त्यात नोरा ही ब्लॅक स्विमसूटमध्ये दिसत आहे. यात तिच्या हातात मोबाईल असून ती एका स्विमिंगपूलजवळ बसली आहे. त्यासोबतच नोराने इन्स्टाग्रामवर काही स्टोरीही पोस्ट केल्या आहेत. त्यात ती स्विमिंगपूलचा आनंद घेताना दिसत आहे.
नोरा फतेहीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा फोटो शेअर करताना चाहत्यांना एक प्रश्नही विचारला आहे. “मी माझ्या पुढच्या सुट्टीचे नियोजन करत आहे. कोणाला सहभागी व्हायचे आहे का?” असा प्रश्न नोराने हा फोटो पोस्ट करत विचारला आहे. तिच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
दरम्यान सध्या नोरा फतेही ही ‘डान्स मेरी रानी’ या गाण्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. नोरा आणि गुरु रंधावाने नाच मेरी राणी या म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र काम केले आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. याचा गाण्याच्या शूटींगदरम्यानचे अनेक व्हिडीओ समोर आले होते. यावेळी नोराने जलपरीचा ड्रेस परिधान केला होता.