मनोरंजनसृष्टीत असे काही कलाकार आहेत, ज्यांचे जगभरात चाहते आहेत. मात्र या कलाकारांसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या काही व्यक्ती अस्तित्वात असल्याचे पाहायला मिळते. हृतिक रोशन आणि हॉलीवूड अभिनेता ब्रॅडली कूपर, आमिर खान आणि टॉम हँक, ऐश्वर्या रॉय आणि स्नेहा उल्लाल, झरीन खान आणि कतरिना कैफ यांसारख्या अनेक कलाकारांसारखे दिसणाऱ्या व्यक्ती अनेकदा पाहायला मिळतात. आता मात्र सोशल मीडियावर दोन अभिनेत्रीच एकसारख्या दिसत असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. या दोन अभिनेत्री हुबेहूब एकमेकींसारख्या दिसत असून नेटकऱ्यांनी आता आश्चर्य व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

‘महाराज’ चित्रपटातून नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली शालिनी पांडे आपल्या चित्रपटामुळे नाही तर तिच्या दिसण्यामुळे चर्चेत आली आहे. या अभिनेत्रीची तुलना दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या अभिनेत्रीबरोबर केली जात नसून आलिया भट्ट बरोबर केली जात आहे. दोघींच्या चेहऱ्यात, दिसण्यात खूप साम्य असल्याचे सोशल सोशल मीडियावर म्हटले जात आहे.
शालिनी पांडेने ‘अर्जुन रेड्डी’ या तिच्या डेब्यू चित्रपटातून प्रेक्षकांचे मन जिंकले होते. तरुण वर्गाची ती क्रश होती. तेलगू सुपरस्टार विजय देवरकोंडा बरोबर तिची केमिस्ट्री चाहत्यांना आवडल्याचे पाहायला मिळाले होते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतर तिने बॉलिवूडकडे मोर्चा वळवला. जेव्हा तिने जयेशभाई जोरदार (२०२२) मध्ये रणवीर सिंग बरोबर गुजराती गृहिणीची भूमिका साकारली तेव्हा अनेक चाहत्यांनी तिची तुलना अभिनेत्री आलिया भट्टशी केली होती. पण त्यानंतर या चर्चा थांबल्या होत्या. मात्र आता जेव्हा ‘महाराज’ या नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटात जुनैद खानबरोबर किशोरीच्या भूमिकेत शालिनी अभिनय करताना दिसली, तेव्हा आलिया भट्ट आणि शालिनी पांडे यांच्या हुबेहूब दिसण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. महत्वाचे म्हणजे, या दोन्ही अभिनेत्री इतक्या एकसारख्या दिसू शकतात, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काहींनी ‘महाराज’ चित्रपटात आलिया भट्टने शालिनी पांडेसाठी डब केल्याचेदेखील काही चाहत्यांनी म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी शालिनी आलियासारखी दिसते हे खरे आहे मात्र अभिनयाच्या बाबतीत आलिया भट्टची शालिनीने नक्कल करु नये, अजूनही वेळ गेलेली नाही, असा सल्लाही अभिनेत्रीला दिला आहे.

हेही वाचा: ‘महाराज’ चित्रपटातील सेक्स सीनबद्दल शालिनी पांडे म्हणाली, “मी तो सीन केला आणि अचानक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘महाराज’ हा जुनैद खानचा डेब्यू चित्रपट असून प्रेक्षक चित्रपटाबद्दल संमिश्र प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. चित्रपटात जुनैद खान आणि शालिनी पांडे स्क्रीन शेअर करताना दिसत आहेत.