प्रेक्षकांमध्ये ओटीटीची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना चित्रपटगृहात बसून चित्रपट पाहण्याचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे ते घरीच ओटीटीवर जगभरातील चित्रपट, वेब सीरिज अन् शो बघणं पसंत करतात. अनेकजण ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला प्रदर्शित होणाऱ्या नवीन वेब सीरिज आणि चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. दर आठवड्याला ओटीटीवर कोरियन, इंग्रजी, हिंदी, दाक्षिणात्या चित्रपट प्रदर्शित होत असतात. या वीकेंडला तुम्हाला ओटीटीवर नवीन काय पाहता येईल, त्याबद्दल आम्ही सांगणार आहोत.

या आठवड्यात बॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट ओटीटीवर येतोय. तीन अभिनेत्री मुख्य भूमिकेत असलेला ‘क्रू’ चित्रपट जर तुम्ही थिएटरमध्ये पाहू शकला नसाल तर आता तो तुम्हाला घरी बसून पाहता येणार आहे. याशिवाय रणदीप हुड्डाचा ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ सिनेमाही ओटीटीवर येतोय. या वीकेंडला कोणते चित्रपट आणि वेब सीरिज कुठे आणि कधी प्रदर्शित होणार आहेत, ते पाहुयात.

“ते गडकिल्ले तुमच्या बापाचे नाहीत”, गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी; म्हणाले, “तुम्ही असले चाळे…”

‘क्रू’

‘क्रू’ हा कॉमेडी चित्रपट आहे. याचं दिग्दर्शन राजेश ए कृष्णन यांनी केलं आहे. या चित्रपटात तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनॉन या तिघीही आघाडीच्या अभिनेत्रींनी एअर होस्टेसच्या भूमिका साकारल्या आहेत. तर दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा हे दोघेही महत्त्वाच्या पण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहेत. एकता कपूर, रिया कपूर, अनिल कपूर आणि दिग्विजय पुरोहित यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट २४ मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ७५ कोटी रुपयांचं बजेट असलेल्या या चित्रपटाने जगभरात १५६.३६ कोटी रुपयांची कमाई केली होती.

तमन्ना भाटियाच्या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर जलवा, १७ दिवसांपासून करतोय तुफान कमाई; तुम्ही पाहिला का?

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’

‘स्वातंत्र्य वीर सावरकर’मध्ये रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातून त्याने दिग्दर्शनातही पदार्पण केलं. स्वातंत्र्य वीर सावरकर चित्रपट हा वीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित आहे. २० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यात अंकिता लोखंडे, अमित सियालसह अनेक कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २८ मे रोजी झी ५ वर पाहता येईल.

Video: पहिल्यांदाच दिसला दीपिका पादुकोणचा बेबी बंप; मतदानानंतर गर्दीत पत्नीची काळजी घेताना दिसला रणवीर सिंग

‘वॉन्टेड मॅन’

चित्रपटाची कथा एका गुप्तहेराभोवती फिरते जो एका महिलेच्या गुन्ह्यामागची गोष्ट काय आहे, याचा शोध घेण्यासाठी मेक्सिकोला जातो. हा चित्रपट २४ मे पासून लायन्सगेट प्लेवर पाहू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘द कार्दशियन्स’

‘द कार्दशियन्स सीझन ५’ २३ मे रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होईल.