भारतीय गायक आणि संगीतकार अमर सिंह चमकिला हे एके काळचे पंजाबी संगीतविश्वातील एक मोठे नाव होते. ते पंजाबचे सर्वाधिक विक्रमी रेकॉर्डची विक्री करणारे कलाकार होते. ८ मार्च १९८८ रोजी त्याची हत्या झाली. ते आणि त्यांची पत्नी अमरजोत कौर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. आता ही गोष्ट तुम्हाला चित्रपटाच्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘अमर सिंह चमकिला’ चित्रपटाचा टीझर मंगळवारी ३० मे रोजी प्रदर्शित करण्यात आला. इम्तियाज अली दिग्दर्शित आणि ए. आर. रहमान यांचं संगीत असलेल्या या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा : विवेक ओबेरॉयमुळे अपूर्व लाखियाला पत्करावा लागला चित्रपटसृष्टीचा रोष; खुद्द दिग्दर्शकानेच केला खुलासा

अमर सिंह चमकिला हे पंजाबच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम लाइव्ह स्टेज गायकांपैकी एक मानले जातात. खेड्यातील प्रेक्षकांमध्ये ते खूप लोकप्रिय होते. ज्या पंजाबी खेडेगावात ते लहानाचे मोठे झाले. त्या गावातील जीवनाचा, तिथल्या परंपरेचा, तिथल्या संगीताचा त्यांच्यावर चांगलाच प्रभाव होता. त्यांनी विवाहबाह्य संबंध, वृद्धत्व, मद्यपान, अमली पदार्थांचा वापर आणि पंजाबी पुरुषांचा रागीट स्वभाव यावर बरीच गाणी लिहिली. यामुळे बऱ्याचदा अमर सिंह चमकिला वादाच्या भोवऱ्यातही अडकले.

८ मार्च १९८८ चा दिवस अमर सिंह चमकिलाचे चाहते कधीही विसरू शकत नाहीत. अमर सिंह आपली पत्नी अमरजोतबरोबर एका कार्यक्रमासाठी पंजाबमधील मेहसमपूर येथे येणार होते. पहाटे दोनच्या सुमारास ते त्यांच्या कारमधून निघाले, मात्र कारमधून उतरताच दोघांवर गोळीबार करण्यात आला आणि तिथेच त्या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेत इतर लोकही जखमी झाले. या प्रकरणात आजवर कुणालाच अटक झालेली नाही त्यामुळे अजूनही याचा निकाल लागलेला नाही. ही घटना शीख दहशतवाद्यांनी घडवून आणल्याचं सांगण्यात येतं पण अद्यापही अमर सिंह चमकिला यांची हत्या का झाली याचं उत्तर मिळालेलं नाही.

मराठीतील सर्व ओटीटी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dilijit dosanjh starrer imtiaz ali next chamkila teaser out based on amar singh chamkila avn
First published on: 30-05-2023 at 13:20 IST