चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्याबद्दल दिग्दर्शक अनुराग कश्यपचं वक्तव्य; म्हणाला "केवळ स्वार्थासाठी..." | director anurag kashyap speaks about films releasing on ott platforms and its disadvantage | Loksatta

चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित करण्याबद्दल दिग्दर्शक अनुराग कश्यपचं वक्तव्य; म्हणाला “केवळ स्वार्थासाठी…”

अनुराग कश्यप दिग्दर्शित आगामी ‘ऑल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे

anurag kashyap on ott platforms
फोटो : सोशल मीडिया

शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला शाहरुख प्रेमी गर्दी करत आहेत. चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच दमदार कमाई केली आहे. अनेक ठिकाणी चित्रपटाचे हाऊसफुल्ल शोज सुरु आहेत. नुकतंच प्रख्यात दिग्दर्शक अनुराग कश्यपने पठाण आणि शाहरुख खानवर भाष्य केलं होतं.

दिग्दर्शक अनुराग कश्यप कायमच बॉलिवुडविषयी भाष्य करताना दिसून येतो. ‘पठाण’ चित्रपटावरून बराच वाद निर्माण झाला होता त्यावर अनुराग कश्यप म्हणाला, “हा चित्रपट सगळेजण बघणार ज्याला वाद निर्माण करायचा आहे त्यांना करू दे.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे. शिवाय अनुरागने ओटीटी रिलीज आणि चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होणे यावरही भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : पाकिस्तानी अभिनेत्रीने केलं ‘पठाण’चं कौतुक; म्हणाली “शाहरुख खान हा…”

अनुराग कश्यप आणि संगीतकार अमित त्रिवेदी या दोघांनी ‘ऑल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने ‘मीड-डे’ वृत्तपत्राच्या युट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. त्यात अनुराग म्हणाला, “मला जर माझ्या चित्रपटातून सहज नफा कमवायचा असेल तर मी तो चित्रपट ओटीटीवर विकेन. पण चित्रपटाशी खूप लोक जोडलेली असतात. माझ्या आगामी चित्रपटातील दोन्ही कलाकार तसे नवीन आहेत, त्यांनी त्यांच्या आयुष्यातील ५ वर्षं या चित्रपटासाठी दिली आहेत, त्यामुळे मी केवळ माझ्या स्वार्थासाठी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करणार नाही. केवळ नफ्यासाठी मी त्या दोघांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही.”

अनुराग कश्यप दिग्दर्शित आगामी ‘ऑल्मोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. करण मेहता, अलाया एफ यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतंच अभिनेता विकी कौशल यात ‘डिजे मोहब्बत’च्या भूमिकेत दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे, त्याचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट ३ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व ओटीटी ( Ott ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 19:10 IST
Next Story
“तुम्हीपण बोल्ड आहात…” ‘सेक्रेड गेम्स’मध्ये हॉट सीन्स देणाऱ्या राजश्री देशपांडेचं वक्तव्य