Google most searched web series 2024 : २०२४ हे वर्ष संपत आले आहे. वर्ष संपायला काहीच दिवस बाकी असताना आता गूगलने या वर्षी सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या वेब सीरिजची यादी जाहीर केली आहे. जागतिक यादीत भारतीय, कोरियन व अमेरिकन वेब सीरिजनी स्थान मिळवले आहे. जगातल्या सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या वेब सीरिजच्या यादीत एका भारतीय वेब सीरिजने पहिले स्थान मिळवले आहे.

२०२४ मध्ये गूगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या या भारतीय वेब सीरिजने ‘मिर्झापूर’ आणि ‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजलासुद्धा मागे टाकले आहे. या यादीत एकूण चार भारतीय वेब सीरिज असून, एक भारतीय टीव्ही शो आहे. गूगलने जाहीर केलेल्या यादीनुसार, संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेब सीरिजने सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या वेब सीरिजच्या यादीत पहिला क्रमांक मिळवला आहे. ‘हीरामंडी’ ही या वर्षातील बहुप्रतीक्षित सीरिजपैकी एक होती. सोनाक्षी सिन्हा, शर्मीन सहगल, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा व मनीषा कोईराला अशी दमदार स्टारकास्ट असलेली ही सीरिज संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केली होती. या सीरिजच्या माध्यमातून त्यांनी ओटीटीवर पदार्पण केले. ही सीरिज खूप गाजली. ही सीरिज १ मे २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती.

हेही वाचा…२०२४ मधील गाजलेल्या वेब सीरिजची यादी, तुम्ही पाहिल्यात का ‘या’ कलाकृती?

‘हीरामंडी’ने बहुप्रतीक्षित सीरिज ‘मिर्झापूर ३’लाही टाकले मागे

‘हीरामंडी’ या सीरिजने या वर्षीच्या सर्वाधिक प्रतीक्षित सीरिज असलेल्या ‘मिर्झापूर ३’लाही मागे टाकले. त्याशिवाय या सीरिजने लोकप्रिय दक्षिण कोरियन सीरिज ‘क्वीन ऑफ टीयर्स’ आणि सलमान खान होस्ट करीत असलेल्या रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १८’लाही मागे टाकले आहे.

गूगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या वेब सीरिजची यादी :

हीरामंडी
मिर्झापूर सीझन ३
लास्ट ऑफ अस
बिग बॉस १७
पंचायत
क्वीन ऑफ टीयर्स
मेरी माय हजबंड
कोटा फॅक्टरी
बिग बॉस १८
३ बॉडी प्रॉब्लेम

हेही वाचा…अनपेक्षित कल्पना आणि खिळवून ठेवण्याऱ्या कथा, OTT वरील घोटाळ्यांवर आधारित ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या वर्षी गूगलवर सर्वाधिक शोधल्या गेलेल्या चित्रपटांमध्ये ‘स्त्री २’ने बाजी मारली आहे. या चित्रपटाने ‘कल्की २८९८ एडी’ व ‘12th फेल’ यांसारख्या चित्रपटांनाही मागे टाकले आहे.