बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे बरीच चर्चेत आहे. मलायकाचा रिअलिटी शो ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे कारण या शोमध्ये तिने तिच्या खासगी आयुष्याबाबत बरेच खुलासे केले आहेत. या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे ज्यात मलायका अरोरा आणि नोरा फतेही यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं.

‘मूव्हिंग इन विथ मलायका’च्या नव्या प्रोमोमध्ये मलायकाबरोबर सुरुवातीला करण जोहर दिसत आहे. मलायका करण जोहरची मस्करी करताना दिसत आहे. तर करणही तिला काही प्रश्न विचारताना दिसतो. तो विचारतो, “जेव्हा तुझ्या बॉडी पार्ट्सची चर्चा होते तेव्हा तुला कसं वाटतं?” करणच्या या प्रश्नावर मलायका त्याला गप्प बसण्यास सांगते आणि हा तिचा शो असल्याचीही त्याला आठवण करून देते.

आणखी वाचा- “तिच्याकडे श्रीमंत नवरा पण मी सुंदर असूनही…” भर कार्यक्रमात असं कोणाविषयी बोलली मलायका अरोरा?

या व्हिडीओतील दुसऱ्या एका शॉटमध्ये सुरुवातीला मलायका नोराबद्दल बोलताना ती थोडी मूडी स्वभावाची आहे असं म्हणताना दिसते. त्यानंतर मलायका अरोरा, डान्सर नोरा फतेही आणि टेरेन्स लुईस चर्चा करताना दिसतात. यावेळी टेरेन्स नोरा फतेहीला डान्स करण्यासाठी विचारतो. ज्यावर काही कारणाने नोरा चिडते आणि रागात तिथून निघून जाते. टेरेन्स तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण ती ऐकत नाही. नोराचं वागणं पाहून मलायकाही हैराण होते.

आणखी वाचा- “तो मर्द आहे…” अर्जुन कपूरवरुन ट्रोल करणाऱ्यांना मलायका अरोराने सुनावलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मलायका अरोराच्या शोचा नवा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हा प्रोमो पाहिल्यानंतर आगामी एपिसोडमध्ये बराच मसाला असणार आहे हे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी एपिसोडबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.