शाहरुख खान आणि दीपिका पदूकोणचा ‘पठाण’ हा चित्रपट सुपरहीट ठरला. वेगवेगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले. हा चित्रपट यश चोप्रा यांच्या ‘यश राज फिल्म्स’ या बॅनरखाली बनला असून ‘यश राज’च्या गेल्या काही वर्षांतील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. ज्या यश चोप्रा यांनी ‘यश राज फिल्म्स’ची सुरुवात केली त्यांच्यावर बेतलेला एक माहितीपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

‘फादर ऑफ रोमान्स’ अशी ओळख असणाऱ्या यश चोप्रा यांच्यावर बेतलेल्या ‘द रोमॅंटिक्स’ या डॉक्युमेंट्री सीरिजमध्ये यश चोप्रा यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायला मिळणार आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांचं नाव कसं मोठं झालं? शिवाय त्यांना फादर ऑफ रोमान्स का म्हंटलं जातं यामागील बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार. शिवाय त्यांचा चित्रपटक्षेत्रातील प्रवास आणि त्यांचे चित्रपटाप्रती असलेले प्रेम याबद्दलही बऱ्याच गोष्टींचा खुलासा होणार आहे.

आणखी वाचा : ‘जोकर’ पुन्हा येतोय, पण यावेळेस तो एकटा नाही; व्हॅलेंटाईन्स डे निमित्त दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

या सीरिजमध्ये बॉलिवूडमधील बडेबडे कलाकार यश चोप्रा यांच्या कार्याबद्दल बोलणार असून त्यांच्या आठवणींना उजाळा देताना आपल्याला दिसणार आहेत. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, करण जोहर, अनिल कपूर माधुरी दीक्षित, राणी मुखर्जीपासून रणवीर सिंग, भूमी पेडणेकरसारखे कित्येक बॉलिवूड कलाकार या सीरिजमध्ये दिसणार आहेत. या सीरिजमध्ये प्रथमच भरपूर वर्षांनंतर निर्माते आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रासुद्धा दिसणार आहेत. यातील एका भागात दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी आदित्य चोप्राशी निगडीत एक किस्सा सांगितला आहे. जर आदित्य चोप्राने हा सल्ला सुरज बडजात्या यांना दिला नसता तर कदाचित ‘हम आपके है कौन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला असता.

हे खुद्द सूरज बडजात्या यांनी या नव्या सीरिजमध्ये स्पष्ट केलं आहे. सूरज बडजात्या म्हणाले, “मैने प्यार कीयाचा प्रीमियर होता, तेव्हा आदित्य चोप्राशी माझी भेट झाली, त्याला चित्रपट प्रचंड आवडला. तेव्हा तो तसा लहान होता, त्याने स्वतः माझ्याजवळ येऊन चित्रपटाची प्रशंसा केली. जेव्हा ‘हम आपके है कौन’चा प्रीमियर होता, तेव्हा इंडस्ट्रीतील बऱ्याच लोकांनी हा चित्रपट फ्लॉप होणार असं वक्तव्य केलं होतं, प्रीमियरला आलेल्या प्रत्येकानेच चित्रपटातील चुका दाखवून दिल्या होत्या. आदित्य चोप्रासुद्धा या प्रीमियरला आला होता. नंतर त्याने मला फोन करून चित्रपटाची खूप प्रशंसा केली. मी तेव्हा बुचकळ्यात पडलो कारण सगळेच चित्रपटाबद्दल चांगलं बोलत नव्हते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ते म्हणाले, “याबद्दल बोलताना मला आदित्य म्हणाला की या चित्रपटातील अडीच गाणी कमी करा. चित्रपट चांगलाच हीट ठरेल. अगदी माझ्याही मनात तीच गोष्ट होती, आणि मीसुद्धा ती अडीच गाणी काढली आणि चित्रपटाने इतिहास रचला.” ‘हम आपके है कौन’मध्ये गाणी खूप असल्याने बऱ्याच लोकांना तेव्हा तो चित्रपट रटाळ वाटला होता. आदित्य चोप्राने दिलेल्या एका सल्ल्यामुळे मात्र तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटण्यापासून वाचला.