Upcoming OTT Release In June: जून महिना सुरू झाला आहे आणि या महिन्यात केवळ थिएटरमध्येच नाही तर ओटीटीवरही अनेक उत्तम चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत. या दमदार कलाकृती तुम्ही घरबसल्या पाहू शकता. या यादीत सनी देओलचा ‘जाट’ ते ‘स्क्विड गेम सीझन ३’ आणि ‘राणा नायडू सीझन २’ यांचा समावेश आहे. जूनमध्ये कोणता चित्रपट आणि सीरिज कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कधी येणार आहे ते जाणून घ्या.

स्टोलन

Stolen on OTT: अभिषेक बॅनर्जी स्टारर ‘स्टोलन’ ही सीरिज ४ जून रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. करण तेजपाल दिग्दर्शित ही सीरिज एका मुलाच्या अपहरणाच्या कथेवर आधारित आहे.

जाट

Jaat on OTT: सनी देओलचा ‘जाट’ हा चित्रपट थिएटरमध्ये चांगलाच गाजला होता. हा अ‍ॅक्शन-ड्रामामध्ये सनी देओल ब्रिगेडियर बलदेव प्रताप सिंहच्या भूमिकेत आहे. रणदीप हुड्डाने यात नकारात्मक भूमिका केली आहे. गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित हा चित्रपट ५ जून पासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

छल कपट

Chhal Kapat: The Deception : ‘छल कपट: द डिसेप्शन’ ही थ्रिलर सीरिज ६ जूनला झी 5 वर रिलीज होणार आहे. यामध्ये श्रिया पिळगांवकर इन्स्पेक्टरच्या भूमिकेत आहे. या मर्डर मिस्ट्रीत खूप सारे ट्विस्ट आहेत.

भूल चूक माफ

Bhool Chuk Maaf on OTT : राजकुमार राव आणि वामिका गब्बी ‘भूल चुक माफ’ हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये सुरू आहे, पण तो चित्रपट ६ जून रोजी प्राइम व्हिडिओवरही प्रदर्शित होणार आहे.

द ट्रेटर्स

The Traitors on OTT : करण जोहरचा आगामी शो ‘द ट्रेटर्स’चा नुकताच ट्रेलर लाँच झाला आहे. या शोमध्ये २० स्पर्धक आहेत. हा शो १२ जूनपासून प्रत्येक गुरुवारी रात्री ८ वाजता पाहता येईल.

राणा नायडू सीझन 2

Rana Naidu Season 2 on OTT: राणा दगुबाती व व्यंकटेश यांची गाजलेली क्राइम सीरिज राणा नायडूचा दुसरा भाग नेटफ्लिक्सवर १३ जूनला प्रदर्शित होणार आहे.

केसरी चॅप्टर 2

Kesari Chapter 2 : अक्षय कुमार, आर माधवन, अनन्या पांडे यांचा ‘केसरी चॅप्टर 2’ हा चित्रपट १९१९ सालच्या जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे. १३ जूनला हा चित्रपट जिओ हॉटस्टावर रिलीज होईल.

स्क्विड गेम सीझन 3

Squid Game Season 3 : ‘स्क्विड गेम’चे दोन सीझन हिट झाल्यावर आता तिसरा सीझन २९ जूनपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

मिस्ट्री

Mistry on OTT : राम कपूर व मोना सिंहचा ‘मिस्ट्री’ सिनेमा २७ जूनपासून जिओ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये राम कपूर गुप्तहेराच्या भूमिकेत आहे.

ग्राउंड झिरो

Ground Zero on Prime Video: इमरान हाश्मीच्या ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटाला थिएटरमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. तेजस प्रभा विजय देओस्कर दिग्दर्शित हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. यामध्ये अभिनेत्याने बीएसएफ अधिकाऱ्याची भूमिका केली आहे. हा चित्रपट २७ जून रोजी प्राइम व्हिडिओवर पाहू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फर्स्ट कॉपी

First Copy on OTT : मुनावर फारुकी, क्रिस्टल डिसूझा आणि गुलशन ग्रोव्हर स्टारर ‘फर्स्ट कॉपी’ ही एक क्राइम थ्रिलर मालिका आहे. या मालिकेत प्रेक्षकांना १९९० च्या दशकातील मुंबईची कहाणी पाहायला मिळेल. या सीरिजची तारीख जाहीर झालेली नाही, परंतु ती जूनमध्येच Amazon MX Player वर स्ट्रीम होईल.