मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा दांदळे या नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असतात. आपल्या नैसर्गिक अभिनयाने विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवले आहे. काही महिन्यांपूर्वी लोकप्रिय अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा अपघात झाला होता. या अपघातानंतर तब्बल पाच महिन्यांनी वर्षा दांदळे यांनी सिनेसृष्टीत कमबॅक केले आहे.

वर्षा दांदळे या सध्या रानजाई या मराठी चित्रपटाचे शूटींग करत आहेत. नुकतंच त्यांनी चित्रपटाच्या सेटवरचा एक गमतीशीर व्हिडीओ शेअर केला आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी त्याला भन्नाट कॅप्शन दिले आहे. “रान जाई” सिनेमात अनेक हुन्नरी कलावंत आहेत. त्यातलीच एक नामवंत अभिनेत्री.. माधवी जुवेकर.. हिच्या मेकअपची गंमत, असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.

त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओ अभिनेत्री माधवी जुवेकर या हातात आरसा धरुन मेकअप करताना दिसत आहे. यावेळी वर्षा दांदळे म्हणाल्या, माधवी जुवेकर या त्यांचा मेकअप स्वत: करतात. त्यावर माधवी जुवेकरने ‘नाही नाही असे सांगत फक्त नाक कोरत आहे’ असे म्हटले. त्यानंतर वर्षा दांदळे म्हणाल्या, “त्या फक्त नाक कोरत आहेत, खूप प्रयत्न करत आहेत. जेवढं दिसेल तेवढं गोड मानून घ्या.”

त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंटही केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी या चित्रपटाचे काही फोटोही शेअर केले होते. सिनेमा.. रानजाई… Enjoying शूटिंग असे म्हणत त्यांनी याचे काही फोटो पोस्ट केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्षा तांदळे यांनी पाहिले नं मी तुला या मालिकेत काम केले आहे. त्यांनी या मालिकेत उषा म्हणजेच अनिकेतच्या आईचे पात्र साकारले आहे. ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरली होती. त्यासोबतच वर्षा यांनी ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेत वच्छी आत्या ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. तसेच वर्षा यांनी एकाच या जन्मी जणू, आनंदी हे जग सारे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये ही काम केले आहे. अभिनयाबरोबरच वर्षा यांनी सवेरेंवाली गाडी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.