बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत असतो. मागच्या वर्षी मुंबई क्रुझ ड्रग्ज केस प्रकरणात आर्यनला एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. जवळपास सहा महिन्यांनंतर या प्रकरणात आर्यनला एनसीबीकडून क्लीन चीट देण्यात आली होती. आर्यन खानने नुकतंच ‘आदिदास’ या मोठ्या कंपनीसाठी फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधले काही फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आर्यनने ‘NMD_V3’ हे आदिदास कंपनीचे शूज घातलेले आहेत. आर्यन खानचे अनके मित्रमैत्रिणीदेखील आहेत. एका पाकिस्तानी अभिनेत्रीने आर्यन खानबद्दलची एक खास पोस्ट शेअर केली आहे.

या पाकिस्तानी अभिनेत्रीचं नाव आहे ‘सजल अली’, फवाद खानच्या ‘बेहद’मध्ये सजल अलीने एका त्रासलेल्या मुलीची भूमिका साकारली होती, जी आपल्या आईच्या प्रियकराच्या प्रेमात पडते. या चित्रपटातील तिच्या कामाचे समीक्षकांनी कौतुक केले होते. सजल अलीने तिच्या इन्स्टा स्टोरीवर आर्यन खानचा फोटो पोस्ट केला आहे. यासोबतच तिने शाहरुख खानच्या चित्रपटातील ‘हवाये’ गाण्याची पार्श्वभूमी मांडली आहे. यासोबत सजलने रेड हार्ट इमोजीही टाकला. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

“मी हा चित्रपट केला कारण.. ” जेव्हा अभिनेता विवेक ओबेरॉयने केला होता खुलासा

कोण आहे सजल अली?

सजलचा जन्म १७ जानेवारी १९९४ रोजी लाहोर, पाकिस्तानमध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव सईद अली असून ते एक व्यापारी आहेत. तिच्या आईचे नाव राहत होते. ती गृहिणी होती. २०१७ मध्ये कर्करोगाशी लढा देताना त्यांचे निधन झाले. सजलला दोन बहिणी आणि भाऊ आहेत. तिची धाकटी बहीण सबूर ही देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सजल अलीने आपल्या करियरची सुरवात २००९ साली पाकिस्तानी टीव्ही विश्वातून सुरवात केली होती. आपल्या करियरमध्ये तिने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. सजल अलीने मॉम या बॉलिवूड चित्रपटात काम केले आहे, ज्यामध्ये ती श्रीदेवीच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचा ‘व्हॉट्स लव्ह गॉट टू डू विथ इट’ या चित्रपटाचा प्रीमियर टोरंटो फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला.