‘पुलवामा देशाचा भाग नाही का?’; दिग्दर्शकाचा प्रकाश जावडेकर यांना संतप्त सवाल

प्रकाश जावडेकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बॉलिवूड दिग्दर्शकाचा संतप्त सवाल

“गेल्या सहा वर्षात देशात एकही बॉम्ब स्फोट झालेला नाही.” असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं होतं. एका जाहीर कार्यक्रमात केलेल्या या वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान बॉलिवूड दिग्दर्शक ओनिर यांनी पुलवामा हल्ल्याची आठवण करुन देत जावडेकर यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

काय म्हणाले ओनिर?

“पुलवामा देशाचा भाग नाही का?” अशा आशयाचे ट्विट करुन ओनिर यांनी जावडेकर यांच्यांवर टीका केली आहे. गेल्या वर्षी १४ फेब्रुवारीला जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला होता.

जैश ए मोहम्मदचा मुदस्सिर हा पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या पार्श्वभूमीवर ओनिर यांचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी ओनिर यांच्या या ट्विटचा आधार घेत जावडेकरांवर टीका केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Prakash javadekar pulwama attack 2019 indian film director onir mppg