३० वर्षांची झाल्यानंतर प्रियांकाचे करिअर होणार नाही, आईने व्यक्त केली होती भीती

एका मुलाखतीत प्रियांकाने हा खुलासा केला आहे.

priyanka chopra mother thought she could not have a career after turning 30
बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून प्रियांका ओळखली जाते.
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चत असते. प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्रियांका बऱ्याच वेळा तिच्या आई-वडिलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. एका मुलाखतीत प्रियांकाने तिच्या आईने दिलेल्या सल्ल्यामुळे तिचे बॉलिवूडमध्ये करिअर झाले असे सांगितले आहे.

प्रियांकाने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत प्रियांकाने सांगितले की आईच्या सल्ल्यामुळे तिचे बॉलिवूडमध्ये करिअर झाले. तिच्या आईने तिला सांगितलं होतं की एकदा ती ३० वर्षांची झाली की तिचं करिअर होऊ शकत नाही. या सल्ल्यामुळे २०१५ मध्ये तिने स्वता:चे प्रोडक्शन हाऊस ‘पर्पल पेबल पिक्चर्स’ सुरु केले.

आणखी वाचा : नाइलाज म्हणून शर्टाला बांधली गाठ, चाहत्यांनी फॅशन समजून केली कॉपी

पुढे बॉलिवूड पदार्पणाबद्दल प्रियांका म्हणाली, “जेव्हा मी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते तेव्हा मला सुरुवातीलाच लोकप्रिय कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली.” प्रियांका पुढे म्हणाली, लेखन, दिग्दर्शन, निर्मिता, अभिनय या क्षेत्रात लोकांना या सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी खूप वेळ लागतो.

आणखी वाचा : ‘तारक मेहता…’मधील नवीन सोनू कोणाला आवडत नव्हती, गोलीने केला खुलासा

दरम्यान, प्रियांकाने तिच्या चित्रपटसृष्टीतील करिअरची सुरुवात ही अभिनेता सनी देओलच्या ‘द हीरो : लव स्टोरी ऑफ अ स्पाय’ या चित्रपटातून केली होती. तर प्रियांकाचा ‘द व्हाईट टायगर’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटातील प्रियांकाच्या अभिनयाची प्रचंड स्तुती करण्यात आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Priyanka chopra mother thought she could not have a career after turning 30 dcp