‘क्रिश’मध्ये हृतिकसोबत प्रियांका ऐवजी दिसणार होती ‘ही’ अभिनेत्री

जाणून घ्या त्या अभिनेत्री विषयी…

krish, priyanka chopra, hritik roshan,

अभिनेते राकेश रोशन आणि त्यांचा मुलगा हृतिक रोशन यांच्या करिअरमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘क्रिश.’ भारतीय सुपरहिरो क्रिश सिरिजमधल्या सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जादू केली होती. क्रिश आणि क्रिश ३ या चित्रपटांमध्ये हृतिक सोबत अभिनेत्री प्रियांका चोप्रा महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. पण तुम्हाला माहिती आहे का सुरुवातीला निर्मात्यांनी प्रियांका ऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड केली होती.

राकेश रोशन यांनी ‘क्रिश’ चित्रपटासाठी प्रियांका ऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीची निवड केली होती. त्यांनी अभिनेत्री अमृता रावची निवड केली होती. हृतिक आणि अमृताने चित्रपटासाठी फोटोशूट देखील केले होते. पण फोटोशूट नंतर हृतिक आणि अमृताची केमिस्ट्री राकेश रोशन यांना फार आवडली नाही. म्हणून त्यांनी अमृता ऐवजी प्रियांका चोप्राची निवड केली आहे.

आणखी वाचा : “लोकं मला साऊथची स्वरा भास्कर म्हणत…”, सिद्धार्थच्या ट्वीटला स्वराने दिले उत्तर

२००६मध्ये अमृताने हिंदूस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला होता. ‘क्रिश चित्रपटासाठी हृतिक आणि माझे फोटोशूट करण्यात आले होते. पण आमच्यामधील केमिस्ट्री इतकी चांगली नव्हती. मी हृतिकसमोर खूप लहान वाटत होते. पण या गोष्टीमुळे मला वाइट वाटले नाही कारण आयुष्यात तुम्हाला त्याच गोष्टी मिळतात ज्या तुमच्या नशीबात लिहिल्या आहेत’ असे अमृता म्हणाली होती.

गेल्या काही दिवसांपासून ‘क्रिश ४’ चित्रपट येणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चित्रपटात देखील हृतिकसोबत अभिनेत्री प्रियांका चोप्रा दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. सध्या या चित्रपटाच्या स्क्रीप्टवर काम सुरु आहे. पुढच्या वर्षी या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करणार असल्याचे म्हटले जात होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Priyanka chopra was not the first choice for hrithik roshan starrer krrish avb