रजनीकांतचा ‘कोचादैयान’मध्ये डबल रोल

तामिळचा सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या अश्विनने प्रदीर्घ चर्चा सुरू असलेला तिचा आगामी चित्रपट ‘कोचादैयान’चा पहिला लुक आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला.

तामिळचा सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या अश्विनने प्रदीर्घ चर्चा सुरू असलेला तिचा आगामी चित्रपट ‘कोचादैयान’चा पहिला लुक आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. या चित्रपटाबद्दल मिळालेल्या माहितीनुसार यात रजनीकांतने डबल रोल भूमिका साकारली आहे. मागील महिन्यात रजनीकांत यांनी चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार विजेता ध्वनी मुद्रक रेसूल पोक्कुट्टी यांच्या बरोबर ध्वनीमुद्रण केले. या चित्रपटात रजनीकांत सोबत अभिनेत्री दीपीका पादुकोण आहे आणि हा चित्रपट प्रदर्शनाच्या टप्प्यात आहे. तसेच या चित्रपटाचे भारतातला पहिला ‘परफॉरमन्स कॅप्चरिंग टेक्नोलॉजी’ ३डी सिनेमा म्हणून प्रमोशन करण्यात येत आहे. या चित्रपटात अभिनेता जॅकी श्रोफ, आर.सारथ कुमार आणि नासर हे देखील आहेत. सिनेमा येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.       

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Rajnikanth in a double role in kochadaiyaan

ताज्या बातम्या