येऊ घातलेल्या ‘रामलीला’ या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका असणारा बॉलिवूड स्टार रणविर सिंग याला डेंग्यूची लागण झाल्यामुळे रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
अली अब्बास जफरच्या ‘गुंडे’ या चित्रपटाचे दुर्गापूर या ठिकाणी चित्रिकरण सुरू असताना सेटवरच रणविरला मोठ्या प्रमाणावर ताप येवून संसर्ग झाला होता.    
चित्रिकरणाच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून व्यावसायीकते विषयी जागरूक असणाऱ्या रणविर याने ताप अंगावर काढत शेड्यूल प्रमाणे चित्रिकरण पार पाडले.
आता हाती आलेल्या वृत्तानुसार ‘डेग्यू’मुळे आजारी असलेल्या रणविरला मुंबईतील रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.    
‘गुंडे’चे निर्माते असणाऱ्या यशराज फिल्मसच्या सुत्रांनी रणविरच्या आजारपणाबद्दल दुजोरा दिला असून, त्याला उपनगरामधील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले आहे.   
मात्र, रणविरच्या प्रकृती बद्दल अधीक माहीती देण्यात आली नाही. आपण त्याची प्रकृती लवकर सुधारेल अशी आपण आशा करूयात.   
मागील वर्षी बॉलिवूड दिग्दर्शक यश चोप्रा यांना ‘डेंग्यू’ची लागण झाल्यामुळे प्रकृती खालावून निधन झाले.