बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रवीनाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रवीनाला फक्त तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या बेधडकपणे बोलण्यासाठी ओळखले जाते. रवीना टंडनला ९० च्या दशकातील सुपरहिट अभिनेत्रीपैंकी एक म्हणून ओळखले जाते. त्या काळात शिल्पा शेट्टी, काजोल आणि करिश्मा कपूर या अभिनेत्रीही प्रचंड लोकप्रिय होत्या. मात्र विविध कारणांमुळे रवीना टंडन आणि या अभिनेत्रींचे एकमेकींशी अजिबात पटायचे नाही. पण नुकतंच रवीनाने एका मुलाखतीत या सर्व गोष्टी फेटाळल्या आहेत. तसेच माझे कोणाशीही शत्रुत्व नसल्याचेही तिने म्हटले आहे.

रविना टंडनने नुकतंच आरजे सिद्धार्थ काननला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला याबाबत प्रश्न करण्यात आला. त्यावेळी ती म्हणाली की, “तेव्हा कोणतेही गलिच्छ राजकारण नव्हते. मी शिल्पासोबत अनेक चित्रपट केले आहेत. काजोल माझी चांगली मैत्रीण आहे. त्यामुळे आमच्यात कधीही मारामारी किंवा भांडण झालेली नाही.”

“माझे तिन्ही नायिकांसोबत चांगले संबंध आहेत. पण त्या काळात आमच्याबद्दल काही गॉसिप नक्की होते. आमच्याविरोधात काही खेळही खेळले जात होते. पण त्यावेळी मी अशा लोकांपासून दूर राहणे पसंत केले,” असेही रवीनाने सांगितले.

“लग्नानंतर मी निकसाठी अनेक रात्री जागून काढल्या कारण…”, प्रियांका चोप्राने केला धक्कादायक खुलासा

विशेष म्हणजे अनेकदा अभिनेत्याच्या प्रेयसीमुळे तिला काही चित्रपट गमवावे लागले होते. याबद्दलचा एक किस्साही रविनाने सांगितला. पण तिने यावेळी कोणाचेही नाव घेतले नाही. रवीना म्हणाली, “एका चित्रपटात मला जाणूनबुजून काढून टाकण्यात आले होते. कारण त्या अभिनेत्याच्या प्रेयसीला मी आवडत नव्हती. तिला माझ्याबद्दल असुरक्षितता वाटत होती. त्यावेळी ती एका नायकाला डेट करत होती. पण आम्ही हिट कपल असल्याने तिने मला रिप्लेस करायला लावले होते. मला चित्रपटातून बळजबरीने काढून टाकण्यात आले. त्यामुळे मी त्याच्यासोबत एक-दोन चित्रपट केले.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रवीनाने १९९१ मध्ये ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. अंदाज अपना अपना, खिलाडी का खिलाडी, बडे मियाँ छोटे मियाँ, शूल आणि अक्स यांसारख्या अनेक दमदार चित्रपटांमध्ये तिने काम केले. ‘दमन’ चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सध्या रवीना ही तिच्या आगामी ‘आरण्यक’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.